शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
4
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
7
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
8
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
9
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
10
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
11
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
12
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
13
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
14
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
15
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
16
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
17
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
18
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
19
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
20
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO

शीर धडावेगळे करून महिलेचा खून

By admin | Updated: July 14, 2016 00:02 IST

सोनगाव कचरा डेपोजवळील घटना : घटनास्थळी कोयता सापडला

शेंद्रे : येथील सोनगाव कचरा डेपोशेजारी कुरण परिसरात अत्यंत दाट झाडीमध्ये ३५ ते ४० वर्षीय महिलेचा शीर नसलेला मृतदेह आढळून आला असून, पोलिसांना घटनास्थळी कोयता सापडला आहे. त्या कोयत्यानेच खून केल्याचा पोलिसांचा संशय आहे. सोनगाव कचरा डेपोजवळून जाताना नागरिकांना दुर्गंधी आल्याने जाऊन पाहिले असता एका महिलेचा अर्ध विवस्त्र मृतदेह दिसला. त्यानंतर त्या लोकांनी याची माहिती पोलिस पाटील यांना दिली. दुपारी तीनच्या सुमारास पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अत्यंत दाट करवंदीच्या झाडीमध्ये हा मृतदेह टाकण्यात आला होता. शीर नसलेले धड असल्यामुळे पोलिसांची शंका अधिकच बळावली. काही अंतरावर झाडीमध्येच गंजलेल्या अवस्थेतील मोठा कोयता पोलिसांना सापडला. त्यामुळे या महिलेचा खूनच झाला असावा, अशी दाट शंका बळावली. पोलिसांनी परिसरात कोणी महिला बेपत्ता आहे का, याची चौकशी सुरू केली आहे. मात्र, रात्री उशिरापर्यंत संबंधित महिलेची ओळख पटली नव्हती. (वार्ताहर)