शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्णात मेघगर्जनेसह वादळी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2016 23:53 IST

सातारा शहरासह जिल्हा कडाक्याच्या उन्हाने त्रस्त झाला होता. जिल्ह्णातील सर्वच भागात पाणीटंचाई भासत असल्याने लोकांचे वळवाच्या पावसाकडे लक्ष लागून राहिले होते.

सातारा : सातारा शहरासह वाई, खटाव, कोरेगाव तालुक्यांमध्ये बुधवारी सायंकाळी वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. खटाव तालुक्यातील पुसेगाव परिसरात दीड ते पावणेदोन तास पाऊस झाला. कोरेगाव तालुक्यातील साताररोड येथील नारळाच्या झाडावर वीज पडली. सातारा शहरासह जिल्हा कडाक्याच्या उन्हाने त्रस्त झाला होता. जिल्ह्णातील सर्वच भागात पाणीटंचाई भासत असल्याने लोकांचे वळवाच्या पावसाकडे लक्ष लागून राहिले होते. अशातच बुधवारी सायंकाळी पावसाला सुरुवात झाली. साताऱ्यात सायंकाळी चारच्या सुमारास काळेढग जमा झाले होते. त्यानंतर साडेसहानंतर काही प्रमाणात पाऊस झाला. त्याचप्रमाणे वाई तालुक्यातही पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या.खटाव तालुक्यातील खटाव, पुसेगाव परिसरात सायंकाळी सातच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. मेघगर्जनेसह सुमारे वीस मिनिटे वादळी वारे अन् पावसाने झोडपून काढले. यामुळे खटावमधील रस्त्यावरून पावसाचे पाणी वाहत होते. त्यामुळे काही काळ विद्युत पुरवठा खंडित झाला होता. पुसेगावसह परिसरातही दीड तास मुसळधार पाऊस झाला. पावसाच्या पाण्यामुळे शिवारातील ओढे, नाले भरून वाहू लागले. या परिसरात जलसंधारणाची मोठी कामे झाली असल्याने पहिल्याच पावसात परिसरात पाणी-पाणी झाले होते. सेवागिरी देवस्थानने येरळा पुलालगत खोलीकरण व नवीन बंधारा बांधला आहे. हा पावसाने भरला आहे. सातारारोडला वीज कोसळलीवाठारस्टेशन : कोरेगाव शहर तालुक्यातील वाठारस्टेशन, देऊर, सातारारोड, किनई, भाले, पिंपोडे बुद्रूक परिसरात बुधवारी चांगला पाऊस झाला. सातारारोड येथील पूरण पोळी वस्तीतील नारळाच्या झाडावर सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास वीज पडली. त्यामुळे झाडाने वरच्या बाजूने पेट घेतला.सातारारोड, ता. कोरेगाव येथे बुधवारी मेघगर्जनेसह वादळी पाऊस झाला. सायंकाळी सहाच्या सुमारास एका नारळाच्या झाडावर वीज कोसळली.