शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
न्यायालयीन क्षेत्रात खळबळ! बीडमधील वडवणी कोर्टात सरकारी वकिलाने संपवले जीवन
5
मुंबई महापालिकेची रंगीत तालीम! ठाकरे ब्रँडची ‘बेस्ट’ युती; ‘असा’ फिरला गेम, नेमके काय घडलं?
6
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
7
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
8
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
9
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
10
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
11
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
12
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
13
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
14
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
15
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
16
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
17
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
18
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
19
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
20
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...

वन्यप्राणी शिवारात; शेतकरी घरात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 14:15 IST

कोयनानगर (जि. सातरा) : कोयना भागातील येराड ता. पाटण परिसरात शेतकरी वन्यप्राण्यांच्या उपद्रवाला त्रासले आहेत. या भागात आता मुख्यत: भात, भुईमुग, नाचणी ही पिके असुन वन्यप्राण्यापासुन त्याचे  मोठया प्रमाणात नुकसान करण्यात येत  आहे. रानडुक्करांनी अक्षरश:  धुमाकूळ घातला आहे. वनविभागाने डुकरांचा बंदोबस्त करावा व झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

ठळक मुद्देकोयना भागातील येराड परिसरात दहशत रानडुकरांसह इतर प्राण्यांचा वावर; पिकाची नासधुस

कोयनानगर (जि. सातरा) : कोयना भागातील येराड ता. पाटण परिसरात शेतकरी वन्यप्राण्यांच्या उपद्रवाला त्रासले आहेत. या भागात आता मुख्यत: भात, भुईमुग, नाचणी ही पिके असुन वन्यप्राण्यापासुन त्याचे  मोठया प्रमाणात नुकसान करण्यात येत  आहे. रानडुक्करांनी अक्षरश:  धुमाकूळ घातला आहे. वनविभागाने डुकरांचा बंदोबस्त करावा व झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

येराड, तामकडे या गावांच्या शिवारात रानडुक्करांपासुन ऊसाचे नुकसान केले जात आहे. ऊस खाण्यापेक्षा तो मोडुनच नासधुस केली जात आहे. तसेच डुकरांकडुन गांडुळ, हुमणी वाळवी यासारखे जमिनीतील जीवजंतु खाण्यासाठी शेतात व बांधावर ठिकठिकाणी खड्डे काढले जात आहेत. शेतातुन ये जा करण्यासाठी पिकांमधे हमरस्ता मळला आहे. काही शेतकºयांनी डुकरांच्या  त्रासाला कंटाळून भुईमुग पिक करणेच सोडुन दिले आहे. खत, बियाणे, तणनाशक, किटकनाशक यांचे वाढलेले दर तसेच मजुरांची टंचाई व शेतीमालाचे अस्थिर दर यामुळे अगोदरच शेतकरी हतबल झाला असुन यात वन्यप्राण्यांची भर पडली आहे. 

डोंगरमाथ्यावर दाट झाडीत राहणारे  वन्यप्राणी  पवनचक्कीमुळे व बेसुमार झालेल्या वृक्षतोडीमूळे हे वन्यप्राणी मानवी वस्तीकडे  स्थलांतरीत होत आहेत. मानवी वस्तीमध्ये  राहण्यासाठी ऊस किंवा ओढा नाल्यातील  निर्जन जागा निवडत असुन खाण्यासाठी जवळच मुबलक अन्न व पिण्याचे पाणी असल्याने प्राण्यांचा राबता दिवसेंदिवस वाढतच आहे. दिवसाढवळ्या शेतातुन रानडुकरांचे कळप जात आहेत. हे जीवावर बेतु शकते. त्यामुळे शेतकºयांमध्ये भितीचे वातावरण आहे. रानडुकरांसह इतर प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकरी शक्कल लढवत आहेत.  बांधावर उग्र वासासाठी  धुर करणे, संपुर्ण  शेताला कुंपन घालणे यासह अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. वन्य प्राण्यांकडून हल्ल्याची भिती

कोयना विभागातील शिवारामध्ये वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याने सध्या शेतकºयांमध्ये भितीचे वातावरण आहे. यापुर्वी रानडुकरांसह इतर प्राण्यांच्या हल्ल्यात शेतकरी जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे शेतकरी शिवारात जाण्यास घाबरत आहेत. प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.