शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपुरात कोणाचे पाऊल मागे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:28 IST

इस्लामपूर : बोरगाव-रेठरे हरणाक्ष गटातील मैदानात इस्लामपुरातील चार उमेदवार आहेत. यातील तिघे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक ...

इस्लामपूर : बोरगाव-रेठरे हरणाक्ष गटातील मैदानात इस्लामपुरातील चार उमेदवार आहेत. यातील तिघे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक आहेत. संस्थापक पॅनल आणि रयत पॅनल यांचे मनोमिलन झाले, तर सत्ताधारी सहकार पॅनलला कोंडीत पकडण्यासाठी दोघांना माघार घ्यावी लागणार आहे. तशी तयारी सुरू झाली आहे.

मागील निवडणुकीवेळी इस्लामपुरातील माजी नगराध्यक्ष दिवंगत विजयभाऊ पाटील यांच्या घरात चकमक झाली होती. त्यांचे चुलत बंधू संजय पाटील सहकारमधून उभे होते, तर संजय पाटील यांचे थोरले बंधू शहाजी पाटील नव्याने स्थापन झालेल्या अविनाश मोहिते यांच्या संस्थापक पॅनलचे स्टार प्रचारक होते. संस्थापक पॅनलकडून विजयभाऊंचे कट्टर समर्थक युवराज पाटील यांनी संजय पाटील यांना कडवे आव्हान दिले होते. ही दुरंगी लढत कृष्णा उद्योग समूहात चर्चेची ठरली होती.

यंदा इस्लामपुरात सहकार पॅनलकडून विद्यमान संचालक संजय पाटील हेच एकमेव उमेदवार आहेत. त्यांच्या शेताच्या बांधाला बांध असलेले माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांचे समर्थक माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांनी रयत पॅनलमधून अर्ज भरला आहे. यापूर्वी ते ‘रयत’च्या डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या नेतृत्वाखालील पॅनलमधून संचालक बनले होते. त्यांची लोकप्रियता आणि आर्थिक ताकद पाहता सहकार पॅनलपुढे ते आव्हान उभे करतील, अशी चर्चा आहे.

या वेळी संस्थापक पॅनलकडून राष्ट्रवादीचे युवराज पाटील आणि दिवंगत एम. डी. पवार यांच्या घराण्यातील माजी नगरसेवक शिवाजी पवार यांनी अर्ज दाखल केला आहे. मनोमिलन झाले तर या दोघांना रणांगणातून माघार घेतल्याशिवाय पर्याय नाही. तिरंगी लढत झाल्यास एक पाऊल मागे कोण घेणार, हा कळीचा मुद्दा ठरणार आहे.

चौकट

इस्लामपुरातील उरुण परिसरात आठशे सभासद संख्या आहे. तेथे नेहमीच भावकीचे राजकारण रंगते. सहकार पॅनलचे डॉ. सुरेश भोसले मूळ रेठरे बुद्रूक येथील यशवंतराव मोहिते यांच्या घरातील आहेत. ते उरुण येथील भोसले-पाटील या भावकीत दत्तक आहेत. त्यामुळे या नात्याचा धागा निवडणुकीत नेहमीच चर्चेत असतो. - अशोक पाटील

इस्लामपूर : बोरगाव-रेठरे हरणाक्ष गटातील मैदानात इस्लामपुरातील चार उमेदवार आहेत. यातील तिघे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक आहेत. संस्थापक पॅनल आणि रयत पॅनल यांचे मनोमिलन झाले, तर सत्ताधारी सहकार पॅनलला कोंडीत पकडण्यासाठी दोघांना माघार घ्यावी लागणार आहे. तशी तयारी सुरू झाली आहे.

मागील निवडणुकीवेळी इस्लामपुरातील माजी नगराध्यक्ष दिवंगत विजयभाऊ पाटील यांच्या घरात चकमक झाली होती. त्यांचे चुलत बंधू संजय पाटील सहकारमधून उभे होते, तर संजय पाटील यांचे थोरले बंधू शहाजी पाटील नव्याने स्थापन झालेल्या अविनाश मोहिते यांच्या संस्थापक पॅनलचे स्टार प्रचारक होते. संस्थापक पॅनलकडून विजयभाऊंचे कट्टर समर्थक युवराज पाटील यांनी संजय पाटील यांना कडवे आव्हान दिले होते. ही दुरंगी लढत कृष्णा उद्योग समूहात चर्चेची ठरली होती.

यंदा इस्लामपुरात सहकार पॅनलकडून विद्यमान संचालक संजय पाटील हेच एकमेव उमेदवार आहेत. त्यांच्या शेताच्या बांधाला बांध असलेले माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांचे समर्थक माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांनी रयत पॅनलमधून अर्ज भरला आहे. यापूर्वी ते ‘रयत’च्या डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या नेतृत्वाखालील पॅनलमधून संचालक बनले होते. त्यांची लोकप्रियता आणि आर्थिक ताकद पाहता सहकार पॅनलपुढे ते आव्हान उभे करतील, अशी चर्चा आहे.

यावेळी संस्थापक पॅनलकडून राष्ट्रवादीचे युवराज पाटील आणि दिवंगत एम. डी. पवार यांच्या घराण्यातील माजी नगरसेवक शिवाजी पवार यांनी अर्ज दाखल केला आहे. मनोमिलन झाले तर या दोघांना रणांगणातून माघार घेतल्याशिवाय पर्याय नाही. तिरंगी लढत झाल्यास एक पाऊल मागे कोण घेणार, हा कळीचा मुद्दा ठरणार आहे.

चौकट

इस्लामपुरातील उरुण परिसरात आठशे सभासद संख्या आहे. तेथे नेहमीच भावकीचे राजकारण रंगते. सहकार पॅनलचे डॉ. सुरेश भोसले मूळ रेठरे बुद्रूक येथील यशवंतराव मोहिते यांच्या घरातील आहेत. ते उरुण येथील भोसले-पाटील या भावकीत दत्तक आहेत. त्यामुळे या नात्याचा धागा निवडणुकीत नेहमीच चर्चेत असतो.