भुर्इंज : सध्या सर्वत्र वाहतूक पोलिसांच्या वतीने सुरक्षा अभियान राबविले जात आहे. मात्र, सोपस्कार म्हणून राबविल्या जाणाऱ्या या अभियानाच्या आर्थिक खर्चाचा भार परिसरातील विविध व्यावसायिकांच्या माथ्यावर मारला जात आहे.वाहतुकीबाबत चालकांमध्ये व नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी पूर्वी वाहतूक सुरक्षा सप्ताह राबविला जात असे. मात्र, आता १५ दिवसांचे अभियान याच उद्देशाने राबविले जात आहे. वास्तविक वाहतूक पोलिसांचे काम हे बारा महिने वाहतूक सुरक्षेसोबत जागृती करण्याचेही आहे. मात्र, दरवर्षी आपला गणेशोत्सव साजरा केला जातो. त्याप्रमाणे हे अभियान साजरे केले जात आहे. उद्घाटनाचा दणकेबाज कार्यक्रम आणि नंतर उरलेल्या दिवसात वाहनांचा स्टिकर लावा आणि पत्रके वाटा यापुढे हे अभियान पुढे सरकत नाही. तेच ते आणि तेच ते, अशाच पद्धतीचे या अभियानातील उपक्रम असतात. किमान या अभियानापुरते आनेवाडी टोलनाक्यासह जोशीविहिरीला दारातच सुरू असणारी वाटमारी बंद केली तरी वाहनचालक मोठ्या आत्मीयतेने या अभियानात सहभागी होतील. पण, तसे न करता दररोजचे काम सुरू ठेवण्यासोबत अभियानासाठी केला जाणारा खर्च वर्गणीच्या स्वरूपात परिसरातील व्यावसायिकांकडून गोळा केला जात आहे. गणेशोत्सव आणि सुरक्षा अभियानामध्ये फरक नाही, तो त्यामुळेच मुळातच वाहतूक पोलिसांचे कर्तव्य नेमके काय? याबाबत अनेकदा वाद झाले आहेत. (वार्ताहर)कशाला हवे अभियान?भुर्इंज पोलीस आणि जोशीविहीर येथील वाहतूक नियंत्रण शाखा यामध्ये वारंवार अंतर्गत वादही राहिला आहे. त्याचे कारण सर्वश्रूत आहे. त्यातच अभियान साजरे करण्यासाठी विनापावती वर्गणी गोळा केली जात असल्याने कशाला हवे ते अभियान? असा प्रश्न या वर्गणीची झळ पोहोचलेल्या व्यावसायिकांकडून उपस्थित केला जात आहे.
व्याप कोणाचा, ताप कोणाला!
By admin | Updated: January 19, 2015 00:25 IST