शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

येऊन-येऊन येणार कोण? उद्या फैसला : सातारच्या खासदारकीबाबत रंगल्या पैजा

By admin | Updated: May 15, 2014 00:23 IST

सागर गुजर ल्ल सातारा सातार्‍यासह संपूर्ण देशात तब्बल नऊ टप्प्यांत लोकसभा निवडणुकीसाठी मतदान झाले. या निवडणुकीच्या

सागर गुजर ल्ल सातारा सातार्‍यासह संपूर्ण देशात तब्बल नऊ टप्प्यांत लोकसभा निवडणुकीसाठी मतदान झाले. या निवडणुकीच्या मतमोजणीला अवघे काही तास राहिले असताना उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी जेवणापासून रोख रकमेपर्यंत पैजा लावल्या आहेत. काहींना तर विजयाची पक्की खात्री आहे; मात्र मताधिक्क्य नेमके किती असणार यावरून चुरशीच्या गप्पा सुरु असलेल्या पाहायला मिळतात. या निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले, पुरुषोत्तम जाधव, राजेंद्र चोरगे, अ‍ॅड. वर्षा माडगूळकर, पांडुरंग शिंदे, अशोक गायकवाड या दिग्गजांसह कधी नव्हे ते १८ उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतरले होते. त्यामुळे १९९६ च्या निवडणुकीची पुनरावृत्ती होण्याची शक्यता सातारा शहरासह जिल्ह्यात वर्तविली जात आहे. प्रत्येक उमेदवाराचे समर्थक आपल्या व्होट बँकेचे गणित करण्यात गुंतलेले पाहायला मिळतात. १८ उमेदवारांपैकी मोजके उमेदवार सोडले तर प्रत्येकाची वेगळी व्होट बँक जिल्ह्यात आहे. त्यामुळे कोणीही निवडून आले तरी अतिशय कमी मताधिक्क्य राहील, असा अंदाज काही जण व्यक्त करत आहेत. दरम्यान, स्थानिक पातळीवरील नगरपालिका, ग्रामपंचायत, विकास सेवा सेवा सोसायट्या व पतसंस्थांच्या कार्यालयांमध्ये उमेदवारांच्या जय-पराजयाच्याच गप्पा आता रंगू लागल्या आहेत. ‘पैज लावू सांगतो...कोण जिंकणार ते!’ यापासून ते ‘किती मताधिक्क्य मिळणार?’ यापर्यंत चर्चेला ऊत आला आहे. तीव्र उन्हाळ्यामुळे गावांतील झाडांच्या पाराखाली बसून जिल्ह्यापासून दिल्लीपर्यंत गप्पा रंगलेल्या पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादीला कुठे दगाफटका झाला व कुठे वाढ झाली, याचेही गणित मांडले जात आहे. वास्तविक, मतमोजणीनंतरच खरं गणित बाहेर येणार असलं तरीही कोरड्या गप्पा जागोजागी रंगलेल्या दिसतात. देशात काँगे्रसचीच सत्ता राहणार की मोदी सरकार बाजी मारणार, आम आदमी पार्टीचे भविष्य कसे राहील, याबाबत राजकारणाची आवड असणारी मंडळी चवीने चर्चा करत आहेत. सातारा शहरात सार्वजनिक वाचनालयांमध्ये राजकीय बातम्याच मोठ्या आवडीने वाचल्या जात आहेत. ‘एक्झिट पोल’ने दर्शविलेल्या अंदाजांचे दाखलेही काही जण देत आहेत. विजयी उमेदवार ४ लाखांची ‘लीड’ घेतील, असं आश्चर्यकारक भाकितही काहीजण वर्तवत आहेत. त्याउलट १0 ते ११ हजार मतांनीच खासदार निवडून येतील, असा उलटा अंदाजही व्यक्त होत आहे. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी तव्यात भाकरीच टाकली नसल्याचे राजकीय भाष्य करत सातारच्या जागेबाबत संदिग्धता निर्माण केली होती. उदयनराजेंना पुन्हा उमेदवारी देण्यावरुन पक्षांतर्गत विरोध होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांनी आपला निर्णय काहीसा उशिरा जाहीर केला. उदयनराजेंनीही विविध पक्षांच्या प्रमुखांच्या गाठीभेटी घेऊन सर्वांनाच गाफील ठेवले. थोडक्यात काय, तर शरद पवारांचीच राजकीय खेळी यासाठी कारणीभूत असल्याची चर्चा या निवडणुकीच्या निमित्ताने सातारा शहरासह कºहाड, पाटणमध्येही सुरु आहे. उदयनराजेंना मागील निवडणुकीत मिळालेले तीन लाखांचे मताधिक्य लक्षात घेऊन शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनीही सातारची सुभेदारी आरपीआयचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांच्याकडे सोपविली. आरपीआयने सुरुवातीला संभाजी संकपाळ या मराठा उमेदवाराला पक्षात घेऊन बहुजन समाजाच्या एकीचा दिखावा केला; परंतु नंतर त्या उमेदवाराच्या विश्वासार्हतेवर बोट ठेवून पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांना उमेदवारी दिली. आम आदमी पार्टीचे उमेदवार राजेंद्र चोरगे हे सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघातून आमदारकीची तयारी करतील, अशी चर्चा असताना त्यांच्या खांद्यावर पक्षाने लोकसभेची निवडणूक लढविण्याची जबाबदारी दिली. त्यांनी सुरुवातीच्या काळात प्रचारात चांगलीच मुसंडी मारली होती. पुरुषोत्तम जाधवांना पक्षाने डावलल्यानंतर त्यांनी जोरदार प्रचार केला. वाईच्या ‘होम पीच’सह कºहाड-पाटण तालुक्यांत त्यांनी झंझावाती प्रचार केला. आता मतदारांचा कौल नेमका कोणाच्या बाजूने झुकणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मतदानयंत्रांमधील वास्तव आणि ही उत्सुकता यांच्यात आता अंतर राहिले आहे फक्त २४ तासांचे!