शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
3
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
6
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
7
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
8
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
9
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
10
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
11
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
12
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
13
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
14
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
15
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
16
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
17
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
18
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
19
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
20
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा

मागासवर्गीयांचे अनुदान लाटतंय तरी कोण ?

By admin | Updated: January 30, 2015 23:15 IST

निवड योग्य लाभार्थींची : गैरप्रकार नसल्याचा गटविकास अधिकाऱ्यांचा खुलासा

फलटण : तालुक्यातील ग्रामीण भागातील मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून देण्यात येणारी १५ टक्के अर्थिक अनुदान रक्कम पात्र लाभार्थीनाच मिळाली पाहिजे. अपात्र अनुदान वाटपाच्या तक्रारी होऊ लागल्या असल्याची धक्कादायक माहिती पंचायत समितीच्या मासिक बैठकीत सत्तारुढ गटाचे सदस्य दिलीप अडसूळ यांनी उजेडात आणली. मात्र, मागासवर्गीयामध्ये अनेक जातींचे प्रवर्ग असून त्यांनाही याचा लाभ दिला जातो. त्यामुळे असा काही प्रकार होत नसल्याचा खुलासा गटविकास अधिकारी नीलेश काळे यांनी केला.सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती स्मीता सांगळे होत्या. उपसभापती पुष्पा सस्ते, पंचायत समिती सदस्य जिजामाला नाईक-निंबाळकर, सुनंदा शिंदे, विवेक शिंदे, विठ्ठल नाळे, अमरसिंह बुरुंगले यांच्यासह विविध शासकीय खात्यांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.१५ टक्के अनुदान गरजु आणि पात्र लाभार्थीना दिले जाते काय? वाटपाच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. असा सवाल अडसूळ यांनी केला असता. यावर गटविकास अधिकारी यांनी मागासवर्गीय म्हणजे केवळ एस. सी. नव्हे, तर यामध्ये एस.टी, एन. टी, ओबीसींचाही समावेश असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायती असे अनुदान किंवा अन्य साहित्य देतात; मात्र मागासवर्गीयातील अन्य प्रवर्गातील पात्र लाभार्थींनाही याचा लाभ दिला जातो. केवळ अनुसूचित जातीतील घटकांनाच नव्हे. कारण आपल्याकडे तसा शासन आदेश आहे. त्याप्रमाणे संबंधित सर्वच ग्रामपंचायती त्या प्रमाणे वाटप करीत असल्याचा खुलासा केला. या खुलासाने अखेरचा विषयावर पडदा पडला.तालुक्यातील पीक परिस्थती चांगली असल्याचे सांगत शासनाचे जलयुक्त शिवार अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वानीच सहकार्य करावे. टँकर मुक्त महाराष्ट्र कार्यक्रमाच्या अनुषंगाने २२ गावांमध्ये काम सुरू असुन या कामांमध्ये स्वयंसेवी संस्था लोकांचा सहभाग वाढविण्याचे दृष्टिने प्रमाण चालु आहेत. २०१९ पर्यंत १२ हजार ४१९ कामे करावयाची असून यासाठी २२ हजार २६२ लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. सध्या आपल्याकडे ७५-८० लाख उपलब्ध असल्याने कामे होणे अवघड असले तरी त्या दिशेने प्रयत्न करावे लागणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी डोईफोडे यांनी सभेतुन दिली. उन्हाळा सुरू झाला असून चारा टंचाई निर्माण होऊ नये या दृष्टीने कृषी खात्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले.शिक्षण, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद बांधकाम, ग्रामीण पाणी पुरवठा, जलसंधारण, आरोग्य, एकात्मिक बालविकास सेवा योजना, संपूर्ण स्वच्छता, लघुपाट बंधारे, स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार, इंदिरा आवास, पशुसंवर्धन पंचायत समिती कृषी आदी विभागांच्या कामांचा आढावा यावेळी संबंधित अधिकाऱ्यांकडून घेण्यात आला.सभापती सांगळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. दिलीप अडसूळ यांनी आभार मानले, सभेस अधिकारी, कार्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)वनजमिनीवर अतिक्रमणफलटण तालुक्यातील ७१ गावांमध्ये वन विभागाच्या जमिनी व पडीक जागा असल्याने अशा जमिनी व जागांवर लोकांनी वास्तव्याच्या माध्यमातून अतिक्रमण केले असून संबंधित ग्रामपंचायतीनी सर्व्हे करावा व तसे प्रस्ताव वनविभागाकडे पाठवून देण्याचे सहकार्य करावे; अन्यथा भविष्यात वनविभागाच्यावतीने कारवाई केली जाणार असल्याचा इशारा वनविभागाचे गजानन चव्हाण यांनी सभेत दिला. पंचायत समिती सदस्य दिलीप अडसूळ यांच्यासह अन्य सदस्य व गटविकास अधिकारी काळे यांनी याबाबत तोडगा काय काढता येईल, याबाबतचे वनअधिकारी चव्हाण यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.