शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

सफेद, नुकरा अन् अबलख घोडे...

By admin | Updated: February 1, 2016 00:59 IST

रहिमतपूर : परराज्यातील व्यापारीही दाखल; लाखोंचीे उलाढाल

रहिमतपूर : येथील घोडेबाजारामध्ये राज्यासह परराज्यातीलही व्यापारी, घोडेशौकीन व खरेदीदार यांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे लाखोंची उलाढाल होऊ लागली. तसेच बाजारात घोडेसौंदर्य, सजावटीचे साहित्य विक्रीस असल्यामुळे बाजारपेठ फुलून गेली आहे. दरम्यान, बाजारात काटियावाड सफेद घोडे, नुकरा, काळा अबलक, लाल अबलक, संजाब कलर असे घोडे आले आहेत. सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने व रहिमतपूर नगरपरिषदेच्या पदाधिकाऱ्यांशी घोडे व्यापाऱ्यांची सकारात्मक चर्चा झाल्याने अत्यंत कमी वेळेमध्ये नियोजन झाले. त्यानंतर रहिमतपूर शहरात प्रथमच ही घोड्यांची यात्रा भरली आहे. यावर्षीच्या बाजारात पंजाब, सिंध, धारवाड, राजस्थान, हरियाणा, उत्तरप्रदेश, गुजरात येथून काटियावाड सफेद घोडे, नुकरा, काळा अबलक, लाल अबलक, संजाब कलर, राखाडी, निका तांबडा नाचकाम व लग्नकार्यासाठी लागणारी घोडे आले आहेत. या बाजारात सुमारे २०० घोडे दाखल झाले आहेत. एक ते आठ लाखांपर्यंची घोडी विक्रीसाठी उपलब्ध असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. सुमारे दहा एकराच्या परिसरात नगरपरिषदेने व्यापाऱ्यांना सर्व सुविधा पुरविल्या असल्यामुळे एक शिस्तबद्धपणा या बाजारपेठेला आला आहे. तसेच बाजारपेठेत खोगीर, रैन, अंधारी, छातीपट्टा आदी साहित्यसुद्धा विक्रीस ठेवल्यामुळे व्यापारी घोडा खरेदी केल्यावर त्याला सजवूनच नेण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत. तसेच या व्यापाराला उत्तेजन मिळावे, यासाठी नगरपरिषदेने व्यापाऱ्यांच्यामध्ये व घोड्यांच्या सौंदर्य व नृत्यस्पर्धा सुद्धा आयोजित केल्या आहेत. त्यामुळे एक आगळं-वेगळं रूप बाजारपेठेला आले आहे. यावेळी परिसरातील शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर) घोड्यांच्या लक्षणावर ठरतात दर... रेसकोर्समध्ये पळविण्यासाठी, काहीजण हौसेसाठी तर काहीजण उपजीविकेचे साधन तर काहीजण पैसे कमविण्याच्या हेतूने घोडे खरेदी करत आहेत. प्रामुख्याने घोड्यांच्या लक्षणांवर व्यापारी दर ठरवत आहेत. या यात्रेच्या माध्यमातून गावातील व्यापार वाढण्यासाठी निश्चित मदत झाली आहे. बहुतांश लहान मुलांचे व नागरिकांचे हे एक आकर्षण केंद्र बनले आहे. भविष्यात शहरामध्ये अशा प्रकारची व्यापारी उलाढाल करणारे प्रकल्प नगपरिषदेने आणल्यास उत्पन्न वाढून शहराचा व परिसराचा विकास होईल, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.  

राज्यातील इतर घोडे बाजाराच्या तुलनेत रहिमतपूरातील हा बाजार व व्यापार वाढविण्यासाठी नगरपरिषदेच्यावतीने सर्व सोयीसुविधा पुरविणार आहे. -सुनील माने, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस