शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
5
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
6
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
7
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
8
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
9
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
10
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
11
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
12
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
13
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
14
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
15
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
16
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
17
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
18
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
19
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
20
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो

सहकार कळतं की नाही, हे कृतीतून दाखवले : पाटील

By admin | Updated: May 30, 2016 00:42 IST

टिळक हायस्कूल येथे ‘कृष्णाकाठ’ यशवंतराव चव्हाण स्मृती सभागृहाचे उद्घाटन

कऱ्हाड : ‘सरकार ज्यावेळी सत्तेवर आले, तेव्हा सर्वांना वाटले की यांना काय सहकार कळणार. त्यांच्याकडून काय होणार नाही; मात्र सत्तेवर येताच सहकार हे कळतंही आणि वळतंही हे प्रत्यक्ष कृतीतून दाखवले. आज दोन वर्षांत सरकारने खूप बदल केले आहेत,’ असे प्रतिपादन सहकार, पणन, वस्त्रोद्योग व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.कऱ्हाड येथे रविवारी शिक्षण मंडळच्या टिळक हायस्कूलमधील विशेष शासकीय अनुदानातून बांधण्यात आलेल्या ‘कृष्णाकाठ’ या यशवंतराव चव्हाण स्मृती सभागृहाचे उद्घाटन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास आमदार आनंदराव पाटील, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनिल पाटील, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अरुण गोडबोले, शिक्षण मंडळ कऱ्हाडचे अध्यक्ष बाळासाहेब कुलकर्णी, उपाध्यक्षा शिल्पा वाळिंबे, टिळक हायस्कूलचे मुख्याध्यापक गो. गो. अहिरे, सेके्रटरी चंद्रशेखर देशपांडे, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. अभिनव देशमुख, प्रांताधिकारी किशोर पवार, तहसीलदार राजेंद्र शेळके आदींसह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.यावेळी मंत्री पाटील म्हणाले, ‘सभागृहाच्या अपूर्ण राहिलेल्या कामासाठी शासनाकडे तत्काळ प्रस्ताव पाठवा, तो मान्य करत उरलेल्या कामासाठी निधी दिला जाईल. आज आगामी काळात कौशल्य शिक्षणाला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्याचप्रमाणे क्रीडा क्षेत्र हे करिअरचे क्षेत्र म्हणून प्रसिद्धीस येत असल्याने या क्षेत्रातही विद्यार्थ्यांनी प्रगती करणे महत्त्वाचे आहे.’शिक्षण मंडळ कऱ्हाडचे अध्यक्ष बाळासाहेब कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. संजीव चिवटे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)