शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
2
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
3
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
4
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
5
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
6
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
7
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
9
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
10
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
11
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
12
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
13
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
14
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
15
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
16
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
17
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
18
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
19
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
20
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी

कोरानाकाळात आमचं ठरलंय टीम कुठे आहे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:41 IST

वडूज : खटाव-माण तालुक्यातील गत विधानसभा निवडणुकीदरम्यान माण व खटाव तालुक्‍यांतील सर्वपक्षीय नेतेमंडळी एकत्रित येऊन एक वेगळी विकासात्मक दिशा ...

वडूज : खटाव-माण तालुक्यातील गत विधानसभा निवडणुकीदरम्यान माण व खटाव तालुक्‍यांतील सर्वपक्षीय नेतेमंडळी एकत्रित येऊन एक वेगळी विकासात्मक दिशा देऊ इच्छित होते. त्यांच्या या निर्णयाला दोन्ही तालुक्यांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. असा एकोपा फार क्वचित राजकारणात पहावयास मिळतो. दोन्ही तालुक्यांचा विकास साधण्यासाठी ‘आमचं ठरलंय’ या घोषवाक्याखाली एकत्रित आलेली राजकीय दिग्गज मंडळी कोरोनाकाळात तुरळक दिसत असल्याने तालुक्यातील जनतासुद्धा ही टीम कुठे आहे, असा आर्त सवाल करताना दिसून येत आहे.

माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, प्रभाकर घार्गे, रणजितसिंह देशमुख व अनिल देसाई ही विविध पक्षांतील दिग्गज मंडळी खटाव-माण तालुक्याचा खुंटलेला विकास साधण्यासाठी एकत्रित आली. गत विधानसभा निवडणुकीदरम्यान माण विधानसभा निवडणुकीत एकच उमेदवार देऊन निवडून आणण्याचा निर्धारही यावेळी सर्वांनी केलेला होता. ठरलंय टीमची एकी पाहून भल्याभल्यांच्या पायाखालची वाळू सरकली होती. दोन्ही तालुक्यांतील नेत्यांच्या एकत्रितपणाचे लोकांनीही स्वागत केले; परंतु ही एकी राजकारणापुरतीच मर्यादित असल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या खटाव तालुक्यात आजअखेर १०,१४७ रुग्ण कोरोनाने बाधित होते. यापैकी ८,१६८ रुग्ण बरे झालेले आहेत. यामध्ये २८० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या १,६९९ बाधित रुग्ण ठिकठिकाणी उपचार घेत आहेत. १,२८९ बाधित रुग्ण होम आयसोलेशनमध्ये असून, १९४ बाधित रुग्ण पुसेगाव, पडळ व खटाव येथे कोरोना केअर सेंटरला उपचार घेत आहेत.

जिल्ह्यात रुग्णसंख्येमध्ये झपाट्याने वाढ होत असून, खटाव तालुक्यातही बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. येथील जनतेला लोकप्रतिनिधींनी पोकळ दिलासा देण्याऐवजी काहीही दिलेले नाही, ही बाब खेदजनक असून, येथील लोकांना वार्‍यावर सोडल्याची चर्चाही रंग भरू लागले आहे. अशावेळी राजकारणापुरते एकत्रित येणारी मंडळी सध्या कुठे आहे, याचा तपास येथील जनता करू लागली आहे. निवडणुकीदरम्यान मोठमोठाल्या गप्पा मारणारे हे नेतेमंडळी आता या महामारीदरम्यान मूग गिळून गप्प का, असा आर्त सवाल ही जनतेतून उमटत आहे.

(चौकट)

सवता सुभा....

‘आमचं ठरलंय’मधील माजी कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख व माजी सभापती संदीप मांडवे यांनी ‘एकला चलो रे’ या धर्तीवर दिवस-रात्र एक करून बाधित रुग्णांना मोठा दिलासा देण्याचे काम सुरू ठेवले आहे. प्रत्येक गावागावांत होम आयसोलेशनसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. वास्तविक पाहता या टीमने एकत्रित या महामारीला तोंड दिले तर हेही संकट चुटकीसरशी सुटले असते. या सवत्या सुभ्यामुळे या टीममध्ये दुफळी निर्माण झालेली दिसत आहे.

आयकार्ड फोटो: डाॅ. दिलीप येळगावकर, प्रभाकर घार्गे, रणजितसिंह देशमुख, अनिल देसाई