शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
2
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
3
ZIM vs SA Test: खतरनाक 'सुपर स्पिन'! गोलंदाजाच्या भन्नाट फिरकीने केली फलंदाजांची 'दांडी गुल' (Video)
4
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट
5
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
6
अंबानी-अदानींना टाकले मागे! नागपूरच्या कंपनीने घडवला इतिहास! 'या' अब्जाधीशाची विक्रमी कमाई!
7
खळबळजनक! सोनमपासून प्रेरणा घेऊन बायकोने काढला नवऱ्याचा काटा, बाईकला GPS अन्...
8
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
9
विधानसभेला बंडखोरी केली, अपक्ष निवडणूक लढवली, काँग्रेसकडून बड्या नेत्याचं निलंबन अखेर मागे  
10
Accident Video: भयंकर... धडकी भरवणारा! हॉटेलच्या समोर कारने चौघांना चिरडले; अपघात सीसीटीव्हीत कैद
11
Mumbai: धक्कादायक! पतीला चोरीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून पत्नीवर बलात्कार; पैसे, दागिनेही लुबाडले
12
१ जुलैपूर्वी तिकीट काढलं असेल तर प्रवाशांना द्यावे लागतील अतिरिक्त पैसे? अखेर रेल्वेने केलं स्पष्ट
13
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरुचरित्र सप्ताह करायचा आहे? पारायण कसे करावे? पाहा, नियम व पद्धती
14
धक्कादायक! रिक्षावाल्याला थांबवलं, पैसे घेऊन येतो म्हणाला अन्...; गोरेगावमध्ये तरुणाने संपवले स्वतःचे आयुष्य
15
इराण-इस्रायल युद्धबंदीनंतर सोन्याच्या किमतीत पहिल्यांदाच सर्वात मोठी वाढ! चांदीही चमकली!
16
'या' अभिनेत्याने घेतली निलेश साबळेंची जागा, 'चला हवा येऊ द्या'च्या नव्या पर्वाचं सूत्रसंचालन करणार
17
ENG vs IND : १२३ वर्षांत जे घडलं नाही ते करून दाखवण्याचं चॅलेंज; इथं पाहा टीम इंडियाचा रेकॉर्ड
18
वनप्लस पुन्हा एकदा डबल धमाका करणार; एकात वनप्लस १३ चा कॅमेरा? कोणते फोन येतायत...
19
हुंड्यासाठी पती झाला हैवान! दागिने, AC साठी टॉर्चर; लग्नानंतर ३ दिवसांनी नववधूने संपवलं जीवन
20
५०० वर्षांनी गुरु-शनिचा पॉवरफूल योग: ९ राशींचे कल्याण, अपार लाभ; भरघोस भरभराट, बक्कळ पैसा!

लोकसंख्या नोंदणीचा भुंगा आता ‘माध्यमिक’च्या मागे!

By admin | Updated: October 25, 2015 00:03 IST

प्रशिक्षण झाले सुरू : अशैक्षणिक कामाबाबत मुख्याध्यापक संघ मागणार न्यायालयात दाद

सातारा : राज्यातील प्राथमिक शिक्षकांनी लोकसंख्या नोंदवही अद्ययावतीकरण कामावर बहिष्कार टाकून उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने ही कामे प्राथमिक शिक्षकांवर बधनकारक करू नये, त्यांनी अशी कामे करण्यास नकार दिल्यास त्यांच्यावर कारवाई करू नये, अशा प्रकारचा आदेश दिला आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षक त्यातून सुटले खरे; पण आता लोकसंख्या नोंदणीचा भुंगा माध्यमिक शिक्षकांच्या पाठीमागे लागला आहे. आठ दिवसांपासून या कामाच्या आॅर्डर माध्यमिक शाळांना दिल्या जात असून त्याचे प्रशिक्षणही सुरू झाले आहे. ‘आरटीई’ कायद्याअंतर्गत शिक्षकांना शाळेत थांबणे बंधनकारक आहे. ज्ञानदानात अडथळा ठरतील, अशी कामे शिक्षकांवर लादू नयेत, असे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षकांवर सोपविलेली लोकसंख्या नोंदवही अद्ययावतीकरणाची जबाबदारी त्यांनी नाकारल्यामुळे हे ओझं आता माध्यमिक शिक्षकांच्या डोक्यावर दिले आहे. जास्तीत जास्त शिक्षकांना या मोहिमेत सहभागी करून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे चार-पाच शिक्षक एकावेळी प्रशिक्षणासाठी जात आहेत. शिक्षकांवर अशैक्षणिक कामे लादल्याने त्याचा अध्यापनावर परिणाम होणार आहे. त्यामुळे होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानास जबाबदार कोण, असा सवाल माध्यमिक शिक्षकांमधून व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)  

उद्या गुरुजींची बैठक शासन निर्णयामुळे शाळांवर होणारे गंभीर परिणाम याबाबत सखोल चर्चा करण्यासाठी सोमवार, दि. २६ रोजी जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापकांची सहविचार सभा होणार आहे. मुख्याध्यापक भवन येथे सकाळी दहा वाजता होणाऱ्या सभेस राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष अरुणराव थोरात, सचिव विजयराव गायकवाड, माजी अध्यक्ष सुभाषराव माने उपस्थित राहणार आहेत.  

‘आरटीआई’ कायद्याअंतर्गत लोकसंख्या नोंदीचे काम प्राथमिक शिक्षकांनी नाकारले; ते काम आता माध्यमिक शिक्षकांच्या माथी मारले जात आहे. शिक्षकांना प्रक्षिणासाठी बोलाविले आहे. हे शाळाबाह्य काम अन्यायकारक असून ते न थाबविल्यास न्यायालयात दाद मागणार आहे. - संजय यादव, अध्यक्ष, मुख्याध्यापक संघ