शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या संकेतस्थळावर आता ‘सिटीझन वॉल’

By admin | Updated: May 3, 2016 00:53 IST

कम्पलेंट टॅबही उपयुक्त : सहा भाषांमध्ये नागरिक साधू शकणार संवाद

प्रगती जाधव-पाटील -- सातारा  --जिल्हा पोलिस दलाच्या नूतन सातारा पोलिस संकेतस्थळावर नागरिकांना पोलिस दलाकडून कळविल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या सूचना व अलर्ट देणे सहज शक्य झाले आहे. आता पहिल्यांदाच मराठीसह हिंदी, इंग्रजी, गुजराती, तेलगू आणि कन्नड अशा सहा भाषांमध्ये ही वेबसाईट नागरिकांना पाहता येणार आहे.सातारा जिल्हा पोलिस संकेतस्थळावर अलीकडेच काही बदल करण्यात आले. नागरिकांना पोलिसांशी थेट संवाद साधता यावा, त्यांच्या सूचना तत्परतेने संबंधितांपर्यंत पोहोचाव्यात, या उद्देशाने या संकेतस्थळावर अलीकडेच काही नवीन बदल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, नागरिकांसाठी ‘आॅनलाईन कम्पलेंट टॅब’ कार्यान्वित करण्यात आला असून, नागरिकांच्या अडचणी वेळेत वरिष्ठांपर्यंत पोहोचतील हा त्यामागचा उद्देश आहे.नागरिकांना दिसून येणारे अनुचित प्रकार, गोपनीय माहिती देण्यासाठी ‘कॉन्फीडेन्शिल इन्फो’ हा स्वतंत्र टॅब तयार करण्यात आला आहे. यात नागरिकांचे नाव गोपनीय राहणार असून, अनेक प्रकारच्या अनुचित प्रकारांना वेळेत आळा घालता येणार आहे. नागरिकांनी आपल्याकडील गोपनीय माहिती या टॅबवर देणे अपेक्षित आहे. नागरिकांना सुरक्षतेबाबतच्या सूचना, ट्रॅफिक नियम, माहिती अधिकार व महिलांसाठी सुरक्षिततेसाठीच्या सुविधा व सूचना या वेबसाईटवर पाहायला मिळणार आहेत. सावध पर्यटनाचे आवाहनसातारा जिल्ह्यात पर्यटनाची विविध ठिकाणे आहेत. अनेकदा परगावाहून येणाऱ्या पर्यटकांना या पर्यटनस्थळांवरील धोक्यांची जाणीव नसते. याचा अभ्यास करून जिल्ह्यातील पर्यटनस्थळे, तिथे असलेले धोके आणि घ्यावयाची खबरदारी याचीही इत्यंभूत माहिती या वेबसाईटवर देण्यात आली आहे. पोलिस कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुकसातारा जिल्ह्यामधील पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्या चांगल्या कामकाजाची दखल घेण्यासाठी ‘पॉझिटिव्ह स्टोरीज टॅब’ कार्यान्वित करण्यात आले आहे. यात संबंधित अधिकाऱ्यांनी केलेल्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला आहे. तसेच उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची माहिती ‘पोलिस मॅन आॅफ दि मंथ टॅब’ कार्यान्वित करण्यात आला आहे. यामुळे उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढण्यास मदत होणार आहे.