शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
3
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
4
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
5
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
6
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
7
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
8
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
9
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
10
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
11
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
12
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
13
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
14
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
15
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
16
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
17
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
18
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
19
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
20
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!

आमचं भागलं आता जगाशी काही देणं घेणं नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोविडशी झगडत असलेल्या रूग्णांना आपल्या प्रतिकार शक्तीची मदत करण्यासाठी प्लाझ्मा उपयुक्त ठरतो. स्वत:सह कुटुंबासाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोविडशी झगडत असलेल्या रूग्णांना आपल्या प्रतिकार शक्तीची मदत करण्यासाठी प्लाझ्मा उपयुक्त ठरतो. स्वत:सह कुटुंबासाठी प्लाझ्मा मिळवणाऱ्या कुटुंबाकडून मात्र अन्य गरजवंतांना प्लाझ्मा देण्याबाबत उदासीनता दिसत आहे. कोणी घरातले नको म्हणतायत म्हणून तर कोणी आमची प्रतिकारशक्ती कमी होईल, अशी कारणं सांगून यापासून पळण्याचा प्रयत्न करत आहेत. रूग्ण संख्या वाढत असताना प्लाझ्मा दाते उपलब्ध होत नसल्याचे चित्र दिसते. यासाठी प्लाझ्मा दान चळवळ राबविणे आवश्‍यक झाले आहे.

सातारा जिल्ह्यातील उच्चांकी कोविड रूग्ण सोमवारी आढळून आले. गत सप्ताहापासून कोरोनाची हजारी छातीत धडकी भरवणारी आहे. अशा स्थितीत गंभीर अवस्थेत असलेल्या रूग्णांसाठी प्लाझ्मा जीवनदायी असताना त्याच्याबाबत अनाठायी भीती बाळगल्याने रूग्णांचे हाल होत आहेत. प्लाझ्मा म्हणजे रक्ताला द्रवरूप देणारा पिवळसर पदार्थ. कोविडचा संसर्ग झालेल्या १८ ते ५० या वयोगटातील कोणालाही प्लाझ्मा दान करता येतो. कोविडशी लढा देणाऱ्या रूग्णांना हे प्लाझ्मा जीवरक्षक ठरत आहेत. बहुतांश वेळा ज्येष्ठांना किंवा रक्तदाब आणि मधुमेहाच्या कोविड रूग्णांना प्लाझ्माची गरज भासते. हे प्लाझ्मा शरिरात सैनिकांची भूमिका बजावतात. कोविडचा संसर्गं झाल्यानंतर शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते. अशावेळी शरीरातील विषाणूंशी लढाई करण्यासाठी प्लाझ्मारूपी सैन्य उपयुक्त ठरते. कोरोनामुक्त झाल्यानंतर दीड महिन्यांनी अँटिबॉडी टेस्ट करावी लागते. ही टेस्ट करून त्यात दहाच्या पुढे स्कोअर असेल तर ४० वर्षांपुढील व्यक्तीही प्लाझ्मा दान करू शकतात. काढलेल्या रक्तातून फक्त प्लाझ्मा वेगळा करून घेतला जातो. लाल रक्तपेशी दात्याच्या शरीरात परत पाठवल्या जातात.

प्लाझ्मा मिळवून देण्यासाठी राज्यासह राज्यभरातील कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. परस्परांशी संपर्क साधून ते आपापल्या भागातील रूग्णांसाठी विविध रक्तपेढ्यांतून प्लाझ्मा मिळवून देतात. रूग्ण संख्या सर्वत्रच वाढल्याने प्लाझ्मा उपलब्ध होणंच कमी झालं आहे. प्लाझ्मा मिळवून देण्यासाठी धडपडणाऱ्या स्वयंसेवकांनी परजिल्ह्यासह इतर राज्यांतूनही डोनर उपलब्ध करून रूग्णांना प्लाझ्मा उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे कोविडमुक्त झालेल्या प्रत्येकाने प्लाझ्मा दान करण्याचा निश्‍चय करावा, त्यामुळे अनेकांचे प्राण वाचणार आहेत.

चौकट :

प्लाझ्मा दान शिबिरांची गरज

प्लाझ्मा दान करण्याने अशक्तपणा येईल, आमच्या शरीरातील प्लाझ्मा काढला तर शरीराची प्रतिकारशक्ती कमी होईल असे समज समाजात पसरले आहेत. त्यामुळे प्लाझ्मा दान करण्याकडे अनेकजण पाठ करतात. मोठ्या शहरांमध्ये अलीकडे जागृती होऊन प्लाझ्मा मिळू लागलेत. पण मागणीपेक्षा पुरवठा अद्यापही कमीच असल्याने रूग्णांना प्राणांना मुकावे लागत आहे. रक्ताचा तुटवडा भासला तर ज्या पध्दतीने रक्तदान शिबिर घेतले जाते, तसंच प्लाझ्मा दान शिबिरे घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढं येणं आवश्यक बनलं आहे.

कोट :

रूग्ण संख्या जास्त असल्याने प्लाझ्माची गरजही वाढली आहे. ज्यांना आम्ही प्लाझ्मा उपलब्ध करून दिले, त्यातील बहुतांश जणांनी प्लाझ्मा दान करण्यास नकार दिला. कोविडशी सामना केल्यानंतर आणि आपण प्लाझ्मा दान केल्यानंतर प्रतिकारशक्ती कमी होईल, अशी भीती मनात बसल्याने कोणी पुढं येत नाही, यासाठी प्रबोधन होणं गरजेचं आहे.

-गणेश नलवडे, प्लाझ्मा डोनर संघटना