शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या मेळाव्याशी आमचा काहीही संबंध नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:47 IST

काही ठेकेदारांनी भोंदवडे (ता. सातारा) येथे राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला असल्याचे समजले. त्यासाठीच्या फलकांवर आमची नावे प्रसिध्द केली. ...

काही ठेकेदारांनी भोंदवडे (ता. सातारा) येथे राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला असल्याचे समजले. त्यासाठीच्या फलकांवर आमची नावे प्रसिध्द केली. मात्र त्या ठेकेदारांनी आम्हाला विचारात न घेता, आम्हाला काहीही कल्पना न देता हा मेळावा घेतला आहे. काही ठेकेदारच जर सगळं काही ठरवणार असतील, तर पक्षही त्यांनीच वाढवावा. आमचा या मेळाव्याशी काहीही संबंध नाही आणि मेळाव्यात आमचा कसलाही सहभाग नाही. त्यामुळे परळी भागातील जनतेने गैरसमज करून घेऊ नये, असे जिल्हा परिषद सदस्या कमल जाधव, पंचायत समितीचे उपसभापती अरविंद जाधव आणि सदस्या विद्या देवरे यांनी स्पष्ट केले आहे. फलकावर आमची नावे असल्याने लोकांचा गैरसमज झाला आहे. वास्तविक या मेळाव्याशी आमचा काहीही संबंध नाही. काही ठेकेदार जर पक्षाच्या कार्यक्रमांशी संबंधित निर्णय घेणार असतील, तर, त्यांनीच पक्षवाढ आणि पुढचं सगळं बघावं.

चौकट

बाबाराजे हाच आमचा पक्ष

कोणत्या पक्षाचा मेळावा आहे आणि तो कोणी घेतलाय याच्याशी आमचा काहीच संबंध नाही. परळी गाव आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठीशी कायम राहिले आहे आणि पुढेही राहील. आम्ही पक्ष वगैरे मानत नाही तर, बाबाराजे हाच आमचा पक्ष आहे, अशी प्रतिक्रिया परळी गावचे सरपंच बाळकृष्ण जाधव आणि ग्रामस्थांनी दिली.