शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

आम्हाला बंद नको तर सवलत हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:44 IST

फलटण तालुक्यात सोमवारी २९ गावे ‘प्रतिबंधित क्षेत्र’ म्हणून जाहीर करण्यात आली. यामध्ये तरडगावचं नाव पुन्हा पाहून व्यापारीवर्गाचं अवसानच गळून ...

फलटण तालुक्यात सोमवारी २९ गावे ‘प्रतिबंधित क्षेत्र’ म्हणून जाहीर करण्यात आली. यामध्ये तरडगावचं नाव पुन्हा पाहून व्यापारीवर्गाचं अवसानच गळून पडलं. कारण दीड वर्षांपूर्वी जसा कोरोना उद्‌भवलाय तसा तो गावातून हद्दपार होण्याचं नाव घेईना. दरम्यानच्या काळात मोठी बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या या पेठेत छोट्या व्यापाऱ्यांच मोठं नुकसान झालं आहे. गावातील काही दुकानदार हे व्यवसाय पूर्णवेळ होत नसल्याने तोट्यात आहेत. कारण विविध पतसंस्थांकडून घेतलेल्या कर्जाचे हफ्ते भरले जात नाहीत. त्यामुळे वसुलीचा तगादा त्यांच्या पाठीमागे लागत आहे तसेच अनेक व्यावसायिक हे ग्रामपंचायतीच्या व खासगी व्यापारी गाळ्यात भाडेतत्त्वावर व्यवसाय करत आहेत. गावात कोरोनाबाधितांची संख्या वाढली की प्रतिबंधित क्षेत्र जाहीर होऊन गाव पूर्ण बंद ठेवलं जातं आहे. यामुळे गाळा भाड्याचे पैसे हकनाक वाढत आहेत तर कित्येकदा व्यवसायच बंद आहे तर पैसे आणायचे कुठून, हा प्रश्न पडत आहे.

कोरोनाकाळात काहींनी तर आपले व्यवसाय देखील बदलले आहेत. नवीन व्यवसायात रूळण्यापूर्वीच वारंवार गाव बंदला सामोरे जावे लागत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. पूर्ण गाव बंद न करता दुकानांसाठी ठराविक वेळ द्यावी तसेच ज्या भागात कोरोना रुग्ण आढळले असतील त्या भागातच प्रतिबंधीत क्षेत्र जाहीर करावे, अशी मागणी देखील होत आहे.

(चौकट)

लोणंद पोलिसांनी केली दुकाने बंद

वारंवार होणाऱ्या बंदला विरोध करत तरडगावमधील व्यापाऱ्यांनी बैठकीत झालेल्या निर्णयाप्रमाणे मंगळवारी सकाळी दुकाने सुरूच ठेवली होती. मात्र, दुपारी लोणंद पोलिसांनी ये दुकाने बंद करा अन्यथा कारवाई केली जाईल, असे सांगताच सर्वांनी दुकाने बंद केली.

(चौकट)

प्रशासनाचा काही गोष्टीकडे कानाडोळा

बाजारपेठेत अनेक नागरिक हे अजूनही विनामास्क फिरताना तर युवकवर्ग चौकाचौकांत गर्दी करून गप्पा मारताना दिसतात. त्यांच्यावर मात्र दंडात्मक कारवाई होताना दिसत नाही तसेच काही रुग्ण हे लवकर विलगीकरण कक्षात दाखल न होता घरीच थांबल्याने इतरांना संसर्ग होण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत. कोरोना रुग्णसंख्या वाढली की गाव बंद होत आहे आणि याचा फटका सर्वांना बसत आहे.