शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

‘कऱ्हाड उत्तर’मध्ये परिवर्तनाची लाट

By admin | Updated: August 14, 2014 22:38 IST

बिनकामाचा डंका

कऱ्हाड : ‘कऱ्हाड उत्तरमध्ये विधानसभा मतदारसंघात परिवर्तनाची लाट आली असून, यांची सुरुवात कोपर्डे काशीळ , ता. सातारा येथून आम्ही धैर्यशील कदमांच्या पाठीशी राहून करणार आहोत,’ असे मत कोपर्डे काशीळचे सरपंच संजय कदम यांनी केले. कऱ्हाड उत्तर राष्ट्रीय काँग्रेसचा संवाद यात्रेदरम्यान मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी धैर्यशील कदम, हिंदुराव चव्हाण, सुदाम दीक्षित, भीमराव डांगे, पृथ्वीराज निकम, भरत जाधव, सत्वशील कदम, पंचायत समिती सदस्या प्रतिभा भोसले, महेश घार्गे, अविनाश साळुंखे, जितेंद्र भोसले, उमेश ताटे, दत्तात्रय काशीद, अक्षय डुबल, गोल्डन पवार, सागर शिवदास, सुनील जाधव उपस्थित होते.धैर्यशील कदम म्हणाले, ‘सातारा तालुक्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व आनंदराव पाटील यांच्या माध्यमातून सुमारे ३.५० कोटींचा भरीव निधी देण्यात यशस्वी झालो. मी देखील तुमच्या सारखा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील कार्यकर्ता आहे. लोकांच्या पायाला हात लावून लोकांच्यातच राहून समाजकारणाबरोबरच राजकारण करण्यात यशस्वी झालो, वारसा हक्काने नाही. तेच चेहरा, तेच नेते, तीच घराणी यांना आज जनता कंठाळलेली आहे. लोकांना आता बदल हवाय आणि तो बदल घडविण्यासाठी तुम्ही आम्ही संघटित राहून काम केले पाहिजे. युवा पिढी समाजकारणाच्या माध्यमातून राजकारणात येत आहेत. विकासास त्यासाठी सर्वांनी संघटित होणे गरजेचे आहे’ यावेळी मार्केट कमेटी संचालक हिंदुराव चव्हाण, सुदाम दीक्षित, पृथ्वीराज निकम, भरत जाधव, यांनी मनोगत व्यक्त केले. (प्रतिनिधी)बिनकामाचा डंकाएक-दोन लाखांचे विकासकाम दिल्यानंतर त्याचा उंका पिटणे व बोकड कापण्यास सांगणे आणि त्यावरच जनतेला पाच वर्षे झुलवत ठेवण्याचे काम लोकप्रतिनिधींनी केले आहे. अशा भाषेत ग्रामस्थांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.