शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

मातेनेच बुडविले पोटच्या गोळ्याला पाण्यात

By admin | Updated: September 9, 2014 23:45 IST

विडणीतील अपहरण प्रकरणाचा छडा : दीराच्या लग्नात अडथळा टाळण्यासाठी केले कृत्य

फलटण : विडणी (ता. फलटण) येथील अपहृत बाळाचा आईनेच पाण्याच्या टाकीत बुडवून खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. आंतरजातीय विवाह झाल्याने दिराचे लग्न होण्यात अडथळा येईल, या मानसिकतेतूनच तिने बाळाला मारून टाकले. यामुळे ‘आई न तू जात वैरिणी’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, विडणी येथील सुप्रिया अमित मोरे (वय २०, रा. जंक्शन, वालचंदनगर, ता. इंदापूर, हल्ली रा. चिंचवड, पुणे) यांचा मुलगा रुद्र (वय एक महिना सहा दिवस) याचे शनिवारी (दि. ६) दुपारी सव्वादोनच्या सुमारास अपहरण झाल्याची तक्रार फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. पोलिसांनी गावात ग्रामस्थांच्या मदतीने शोधमोहीम राबविली, मात्र बालक सापडले नव्हते. गावात ज्यांना मूलबाळ नाही, अशांकडेही चौकशी केली होती. त्यामुळे लोक भयभीत झाले होते. त्याच रात्री अकराच्या सुमारास घराजवळील स्वच्छतागृहाजवळील पाण्याच्या टाकीत रुद्रचा मृतदेह तरंगताना आढळून आला होता. त्यानंतर पोलिसांनी सुप्रिया मोरे, तिचे आई-वडील आणि भावाला ताब्यात घेतले होते. चौकशीअंती सुप्रिया हिने स्वत:च्याच मुलाला पाण्यात बुडवून मारल्याचे सांगितले. गर्भपाताचाही केला होता प्रयत्नअमित व सुप्रिया यांनी पाच महिन्यांपूर्वी पुण्यात गर्भपात करण्याचाही निर्णय घेतला, मात्र डॉक्टरांनी नकार दिल्याने बाळंतपणासाठी ती माहेरी विडणी येथे आली होती. मोठ्या दिराच्या लग्नाला अडथळा येईल, त्यामुळे मूलच जिवंत ठेवले नाही तर आपले सर्व प्रश्न मिटतील व सासू-सासरेही चांगली वागणूक देतील, असा विचार करीत शनिवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास घरात कोणी नसताना तिने घराबाहेरील पाण्याच्या टाकीत रुद्रला टाकले. नंतर बाळाचे अपहरण झाल्याचा कांगावा तिने केला.