शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या जिल्ह्यात विकतच पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:37 IST

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात दरवर्षी धो-धो पाऊस पडतो. त्यामुळे जिल्ह्यातील धरण, तलाव फेब्रुवारी, मार्चपर्यंत भरलेले असतात. तरीही सातारकरांवर अनेकदा ...

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात दरवर्षी धो-धो पाऊस पडतो. त्यामुळे जिल्ह्यातील धरण, तलाव फेब्रुवारी, मार्चपर्यंत भरलेले असतात. तरीही सातारकरांवर अनेकदा पिण्यासाठी पाणी विकत घेण्याची वेळ येते. मार्च महिना सुरू झाला की, पुढील दोन महिने पालिकेकडून पाणी कपात केली जाते. याच काळात लग्नसमारंभ, वास्तुशांतीसारखे समारंभ असतात, तेव्हा पै पाहुण्यांना थंडगार पाणी मिळावे म्हणून जार विकत घेण्याचे जणू ‘फॅड’ आले आहे.

पालिकेकडून दर आठवड्याला पाणी कपात केली जाते, त्यामुळे अनेक नागरिक हे जार पिण्यासाठी घेतात. त्याचप्रमाणे मोठमोठ्या सोसायट्यांमध्ये दर दोन दिवसांनी पाच, दहा हजार लीटर क्षमतेचे टँकर मागवावे लागतात. माण, खटाव तालुक्‍यांच्या तर दुष्काळ पाचवीलाच पुजलेला आहे, असं म्हटलं जायचं. पण गेल्या काही वर्षांमध्ये या तालुक्यांमध्ये वाॅटर कप अंतर्गत मोठ्या प्रमाणावर कामे झाली आहेत. त्यातच गेल्यावर्षी झालेल्या दमदार पावसामुळे सर्व भांडी भरलेली आहेत. त्यामुळे माण तालुक्यात अजून तरी टँकर सुरू झालेला नाही. ही एकीकडे जमेची बाजू असली, तरी सातारा शहरात अजूनही विकत पाणी घ्यावे लागते, हे दुर्दैव म्हणावे लागेल.

चौकट...

सहली अन् कार्यालयात

जिल्ह्यात कास, बामणोली, महाबळेश्वर, तापोळा यासारखी असंख्य पर्यटनस्थळे आहेत. याठिकाणी अनेकांच्या कौटुंबिक सहली जात असतात. तेव्हा पिण्याची पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ नये म्हणून आपल्या गाडीमध्ये थंडगार पाण्याचा जार घेऊन ते सहलीला जात असतात. त्याचप्रमाणे शासकीय, निमशासकीय कार्यालय, शाळा-महाविद्यालयांमध्ये शुद्ध पाण्याची सोय केलेली असली तरी आपत्कालिन परिस्थितीत जार सोयीचा वाटत आहे.

- जगदीश कोष्टी

फोटो

प्रुफ/२०कुलिंग वॉटर जार

प्रुफ/२०वॉटर टँकर.पीएनजी