शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सर्व्हिसिंग सेंटरमध्येही पाणीबचत मोहीम

By admin | Updated: May 12, 2016 00:02 IST

जलसाक्षरता वाढतेय : कमी पाण्यात धुतली जातायत वाहने -- लोकमत जलमित्र अभियान

सातारा : एखादी वस्तू आपल्याकडे मुबलक प्रमाणात असले किंवा ती विनामूल्य मिळत असेल तर तिचे महत्त्व राहत नाही. पाण्याच्या बाबतीतही असेच घडले आहे. जेव्हा होतं तेव्हा बेसुमार वापर केला. आता जमिनीतच नाही तर नळाला कोठून येणार, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे लोक पाणीबचत करू लागलेत. वाहने धुण्याच्या सर्व्हिसिंग सेंटरमध्येही आता पाणीबचत होऊ लागली आहे. जलसाक्षरतेसाठी ‘लोकमत’ने ‘जलमित्र अभियान’ सुरू केले असून हॉटेलचालकांप्रमाणेच आता सर्व्हिसिंग सेंटरचालकही या अभियानात सक्रिय झाले आहेत. वाढत्या लोकसंख्येमुळे सातारा शहरात वाहनांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे. पाणीटंचाईमुळे घरी मोठी वाहने धुणे अवघड झाले आहे. साहजिकच सर्व्हिसिंग सेंटर्समध्ये वाहने धुण्यासाठी रोजच गर्दी असते. मात्र सर्व्हिसिंग सेंटरचालकही आता पाणीबचत करू लागले आहेत. गाडीवर पाणी फवारण्यापूर्वी ओल्या कापडाने अगोदर गाडी पुसून घेतल्यास नंतर पाणी कमी लागते. त्यामुळे शक्यतो आम्ही ही पद्धत वापरत असल्याचे शहरातील सर्व्हिसिंग सेंटरचालकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. सातारा शहरातील विविध सर्व्हिसिंग सेंटरचालकांनी गाड्या धुण्यासाठी वेगवेगळे उपाय योजून कमी पाण्यात वाहने कशी धुता येतील, याकडे लक्ष दिल्याचे दिसते. (प्रतिनिधी)मोटारीचा वेग कमीसध्या तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. काही भागात पिण्यासाठीही पुरेसे पाणी मिळत नाही. अशा स्थितीत पाणीबचत गरजेची आहे. आम्ही वाहने धुताना पाण्याच्या मोटारीचा वेग कमी ठेवतो, त्यामुळे कमी प्रमाणात पाणी फवारले जाऊन पाणीबचत होत आहे.- ओंकार भोसले, सातारास्प्रेचा व्हॉल्व्ह बदललागाड्या धुण्यासाठी वापरण्यात येणारा स्पे्र सुस्थितीत असेल तर कमी पाणी फवारले जाते. त्यातील व्हॉल्व्ह व्यवस्थित काम करत नसले तर पाण्याचा अपव्यय होऊ शकतो. यासाठी आम्ही प्रेशर व्हॉल्व्ह बदलला आहे. यामुळे साधारणपणे चाळीस टक्के पाणीबचत होऊ लागली आहे.- पप्पू मोहिते, सातारा