शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

उत्तर कोरेगावात रंगलंंय पाण्याचं राजकारण

By admin | Updated: July 31, 2014 23:29 IST

वाठार स्टेशन : तात्पुरत्या नव्हे कायमस्वरूपी पाण्याची गरज

वाठार स्टेशन : कोरेगाव तालुक्याच्या उत्तर दुष्काळी भागातील २६ गावांत येणाऱ्या विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर समोर ठेवत या गावात मोफत पाणी टँकर, आरोग्य शिबिर घेऊन मतदारांना खुष करण्याचा सपाटा लावला आहे. मात्र, कायम दुष्काळी असलेल्या या भागाचा ‘कायम’ शब्द खोडण्यासाठी तात्पुरत्या टँकरची नव्हे तर कायमस्वरुपी पाण्याची गरज असल्याची भावना लोक व्यक्त करीत आहेत.जिल्ह्यात जरी समाधानकारक पाऊस होत असला तरी कोरेगाव तालुक्याच्या या भागात अजून ५० टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस झाला आहे. लोकसभेला माढा, विधानसभेला फलटण तर इतर निवडणुकांसाठी कोरेगाव अशी तळ्यात-मळ्यात भूमिका असलेल्या या भागात अजून ५० टक्के पेक्षाही कमी पाऊस झाला आहे. या भागाची वरदायिनी असलेली वसना आजही कोरडी आहे. तर नांदवळ, तळहिरा हे प्रमुख तलावही कोरडेच आहेत. त्यामुळे पाणीटंचाई, दुष्काळाचे संकट आजही या भागात कायमच आहे. अगदी या दुष्काळी गावांची हीच नस ओळखून सध्या या गावासाठी काहीजणांनी पाण्याचे टँकर सुरू केले आहेत.त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने का होईना; पण दुष्काळी भागात आता मोफत पाण्याचा सुकाळ आहे, अशीच परिस्थिती सध्या तरी दिसतआहे. दुष्काळाबाबत ‘नाव मोठं, लक्षण खोटं,’ अशी भावना या भागातील मतदार ग्रामस्थांतून व्यक्त होत असून, निवडणुकीत खुद्द शरद पवारांच्याच मतदारसंघात असल्याने उत्तर कोरेगावची बारामती होणार ही आशा धुळीला मिळाली आहे. त्यामुळेच लोकसभेला या दुष्काळी भागानं बारामतीकरांनाही पाणी पाजलं.आता विधानसभेच्या तोंडावर मोफत पाणी टँकर देऊन मत मिळतील का? या प्रश्नाचं उत्तरही येणाऱ्या विधानसभा निवडकुणीतच मिळणार आहे. (प्रतिनिधी)