शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईच्या गावात अखेर ‘जलक्रांती’

By admin | Updated: June 30, 2015 00:20 IST

काळगाव पाणलोट प्रकल्प : पश्चिम घाट विकास योजनेतून जल व मृद संधारणाची कामे

सणबूर : पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून जमिनीत मुरवून त्याद्वारे जलक्रांती आणण्याचे काम पाणलोट विकासाच्या कार्यक्रमातून होत असते. काळगाव, ता. पाटण भागात या कार्यक्रमांतर्गत भरीव काम दृष्टीस पडत आहे. त्यामुळे या भागात जलक्रांती झाल्याचे दिसून येत आहे. पश्चिम घाट विकास योजनेअंतर्गत १९९९ ते २००६ या कालावधीत या भागात पाणी आडवून जिरविण्याचे मोठे काम झाले आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार काळगाव के. आर. ३०/९ या पाणलोटचे एकूण भौगोलिक क्षेत्र ५ हजार ७१८ हेक्टर असून, त्यापैकी ३ हजार ८११ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. तर उर्वरित १८०९ हेक्टर क्षेत्र बिगर ओलिताखाली आहे. त्यापैकी १०६० हेक्टर वनक्षेत्र आहे. या पाणलोटात काळगाव, आचरेवाडी, रामिष्टेवाडी, भरेवाडी, सावंतवाडी, कोळगेवाडी, मुट्टलवाडी, टिटमेवाडी, करपेवाडी, बोरगेवाडी, डाकेवाडी, मस्करवाडी, लोटळेवाडी, येळेवाडी, धामणी, चव्हाणवाडी, पाटीलवाडी, शेडगेवाडी, मस्करवाडी १ व २, बादेवाडी, जाधववाडी, कुटरे, सुपुगडेवाडी, पवारवाडी, वाजोली आदी गावांचा व वाड्यांचा समावेश आहे. यापैकी काही गावांना पूर्वी मोठी पाणीटंचाई जाणवत होती. जानेवारी महिन्यापासून पावसाळा सुरू होईपर्यंत टँकरने पाणीपुरवठा करावा लागत होता. खरीप हंगामात पडणाऱ्या पावसावर प्रामुख्याने भात पीक घेतले जायचे. उत्पादन अगदीच मर्यादित होते. उर्वरित ओलीवर ज्वारीचे पीक घेतले जात होते. जनावरांच्या पाण्याची मोठी गैरसोय होती.या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने लोकप्रतिनिधींच्या मार्गदर्शनाखाली केंद्रशासनाच्या पश्चिम घाट विकास योजनेतून जल व मृदा संधारणाची कामे सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याचा आराखडाही तयार झाला. त्यानंतर दि. ७ डिसेंबर १९९९ रोजी भुरेवाडी येथील मातीनाला बंधाऱ्याच्या कामाचा प्रारंभ तत्कालीन आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. या पाणलोटात आजअखेर मातीनाला बांध, वळण बंधारे, शेततळी, प्लॅनिंग सीसीटी आदी कामे झाली आहेत. पाणीस्त्रोताचे बळकटीकरण झाल्याने अनेक गावांचा पाणीप्रश्न सोडविण्यास मदत झाली. नालाबांध व बंधाऱ्यांतील पाण्याचा वापर करून रब्बी क्षेत्रात वाढ झाली आहे.याशिवाय शेतकरी झेंडू, केळी व पालेभाज्यांची पिकेही घेऊ लागली आहेत. विविध प्रकारची बियाणे आणून शेतीतील नवनवीन प्रयोग ते करीत आहेत. (वार्ताहर) विजेशिवाय शेतीला पाणी...कोळगेवाडीने तर जलसंधारणाच्या माध्यमातून ‘विजेशिवाय शेतीला पाणी’ हा प्रयोग साकारून जलसंधारणाचा ‘कोळगेवाडी पॅटर्न’ महाराष्ट्रापुढे ठेवला आहे. या भागातील अनेक विहिरींची पाणीपातळी वाढली आहे. पूर्वीच्या कोरडवाहू क्षेत्रात चाचपडणारा शेतकरी नव्या प्रवाहात येऊ पाहत आहे. ‘कोळगेवाडी पॅटर्न’ला अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत. प्रकल्पासाठी चार कोटी खर्चलोकप्रतिनिधी, कृषी अधिकारी आणि शेतकऱ्यांचे या पाणलोटासाठी मोठे सहकार्य लाभले आहे. कृषी विभागाने काढलेल्या या अर्थशास्त्रानुसार एकूण पाणीसाठा ९०४ टीसीएम असून, सुमारे ४ कोटी १ लाख ६० हजार रुपये खर्च झाला आहे. प्रकल्पापूर्वीचे बागायती क्षेत्र २६ हेक्टर होते. मात्र प्रकल्पानंतर ते ११७ हेक्टरवर गेले. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली काळगाव भागातील शेतकरी उपलब्ध पाण्याचा पुरेपूर वापर करून शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करीत आहेत.