शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

हिवरेच्या माळावर जलसंधारण, वृक्षलागवडीचे काम

By admin | Updated: July 8, 2015 22:02 IST

लोकसहभाग महत्त्वाचा : मदन भोसले यांच्याकडून कामाचे कौतुक

कोरेगाव : किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांच्या विधायक नेतृत्वातून कारखाना कार्यस्थळावर उभ्या राहिलेल्या जलसंधारण आणि वृक्षलागवडीच्या कामातून प्रेरणा घेऊन हिवरे, ता. कोरेगाव येथील ग्रामपंचायतीने ग्रामस्थांच्या सहभागातून माळरानावर जलसंधारण आणि वृक्षलागवडीचे मोठे काम उभे केले आहे. दरम्यान, लोकसहभागातून उभ्या राहिलेल्या या कामांची पाहणी किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले व संचालक मंडळाने करून हिवरे ग्रामस्थांच्या या विधायक कार्याचे कौतुक केले.हिवरे हे कोरेगाव तालुक्याच्या दुष्काळी उत्तर भागातील जेमतेम तेराशे लोकवस्तीचं गाव. तिन्ही बाजूंनी छोट्या-मोठ्या डोंगरांनी वेढलेल्या या गावातील ग्रामस्थांनी डोंगर उतारावरून वाहून जाणारे पाणी अडविण्याचा शंभर टक्के प्रयत्न केलेला आहे. एकात्मिक पाणलोट विकास, जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत ओढाजोड, तेरावा वित्त आयोग, ग्रामपंचायत स्वनिधी आणि लोकसहभागातून तीस हेक्टर वनखात्याच्या जमिनीवर अनेक लहान-मोठे, कच्चे-पक्के, सिमेंट बंधारे बांधून डोंगर उतारावरून वाहून येणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब अडविण्याचा आणि जमिनीत जिरविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे. गावातील ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच अजित खताळ, उपसरपंच समाधान शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तरुणांनी जलसंधारणाबरोबरच गावमालकीच्या सुमारे ३३ एकर मुरमाड-खडकाळ गायरान जमिनीवर सुमारे साडेपाच हजार सीताफळांची झाडे लावून ग्रामपंचायतीला उत्पन्नाचे एक नवे साधन निर्माण करून दिले आहे. त्याबरोबरच वृक्षलागवड व पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्याचा प्रयत्नही केलेला आहे. त्याअंतर्गत वनखात्याच्या जमिनीवर करंज, आवळा, कडुलिंब अशा विविध जातींच्या वृक्षांचे रोपण करताना ही झाडे शंभर टक्के जगविण्याचा प्रयत्न केलेला आहे. विशेष म्हणजे, गायरान जमिनीवर साडेपाच हजार सीताफळांच्या झाडांना ठिबकने पाणी देण्याची व्यवस्था करून जलबचतीचा संदेशही दिलेला आहे.कारखान्याचे संचालक नंदकुमार निकम, सचिन साळुंखे, नवनाथ केंजळे, केतन भोसले, अ‍ॅड. धनंजय चव्हाण उपस्थित होते. (प्रतिनिधी) ‘रानमेवा उद्याने’ उभारा...लोकसहभागातून अशा प्रकारचे उल्लेखनीय काम उभे राहिलेले पाहून मदन भोसलेंसह सर्वच मान्यवर प्रभावित झाले. हिवरे ग्रामस्थांनी भविष्यात ‘रानमेवा उद्यान’ व ‘बायोडायव्हर्सिटी पार्क’ उभारावा, किसन वीर साखर कारखाना परिवाराचे हिवरे ग्रामस्थांना लोकोपयोगी सार्वजनिक कामासाठी सदैव सहकार्य राहील, अशी ग्वाही देऊन मदन भोसले यांनी ग्रामस्थांच्या सामूहिक प्रयत्नांचे कौतुक केले.