शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

महसूल विभाग ठेवणार आता रात्री वॉच

By admin | Updated: October 8, 2015 01:08 IST

चार पथकांची नियुक्ती : वाळू, मुरुमाच्या चोरट्या वाहतुकीला लगाम

कऱ्हाड : तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी वाळू साठे हे अनधिकृतपणे सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यावर कारवाई करत त्यांचे पंचनामे करण्यात आले होते. त्याबाबत विशेष खबरदारी घेण्यासाठी महसूल विभागाकडून पथकांची स्थापनाही करण्यात आली होती. गेल्या काही दिवसांत तालुक्यात मोठ्या प्रमाणात दगड, वाळू, मुरुमाचे उत्खनन व वाहतूक होत असल्याचे प्रकार घडले होते. त्या अनुषंगाने आता पुन्हा वाळू, दगड, मुरुमाचे उत्खनन तसेच चोरटी वाहतूक होऊ नये, यासाठी येथील महसूल विभागातर्फे चार रात्रगस्त पथकांची तयार करण्यात आली आहे. या पथकांद्वारे रात्रीच्या वेळी वाळू, दगड व मुरुमाच्या वाहतुकीवर लक्ष ठेवण्याचे काम पाहिले जाणार असल्याची माहिती निवासी नायब तहसीलदार बी. एम. गायकवाड यांनी दिली.वाळू, मुरुम, दगडखाणी यांच्या साठ्यामधून वाळू, मुरुम व दगड चोरीस जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा अनधिकृत वाळू, दगड, मुरुम याच्या वाहतुकीवर आळा घालण्यासाठी व होणारी अनधिकृत वाहतूक व उत्खनन यावर दंडात्मक कारवाई करण्यासाठी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांचे मार्गदर्शनखाली चार स्वतंत्र पथके निर्माण करण्यात आली आहे. या पथकामार्फ त मुख्य रस्त्यांच्या ठिकाणी थांबून अनधिकृत वाळू वाहतुकीवर नियंत्रण ठेवले जाणार आहे. यावेळी अनधिकृतपणे वाळू, दगड तसेच मुरुमाची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.तहसीलदार राजेंद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार डी. ए. डुबल व निवासी नायब तहसीलदार बी. एम. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली चार पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकाद्वारे रात्रीच्या वेळी चोरट्या पद्धतीने होणाऱ्या वाळू, मुरूम तसेच दगड वाहतुकीवर लक्ष ठेवले जाणार आहे. (प्रतिनिधी)असे असणार पथकरात्रगस्तीसाठी तयार करण्यात येणाऱ्या पथकामध्ये नायब तहसीलदार डी. ए. डुबल व निवासी नायब तहसीलदार बी. एम. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली १२ मंडल अधिकारी काम पाहणार आहेत. या १२ मंडल अधिकाऱ्यांसोबत २४ तलाठी रात्रीच्या वेळी चोरट्या वाहतुकीवर लक्ष ठेवणार आहे.