शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
4
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
5
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
7
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
8
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
9
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
10
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
11
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
12
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
13
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
14
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
15
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
16
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
17
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
18
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
19
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
20
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
Daily Top 2Weekly Top 5

घाट रस्त्यावर महामार्ग पोलिसांचा ‘वॉच’

By admin | Updated: June 24, 2016 00:55 IST

रस्त्यात होतेय वाहनांची तपासणी : अवैध वाहतुकीला चाप लावण्यासाठी मोहीम; सुर्लीच्या पहिल्या वळणावरच खाकीची ‘एन्ट्री’

कऱ्हाड : महामार्गावरील अवैध वाहतूक रोखण्यासह महामार्ग पोलिसांनी आता घाटमार्गावरही ‘वॉच’ ठेवण्यास सुरुवात केली आहे. शहर परिसरातील रस्त्यांवर पोलिस ठाण मांडत असून, वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे. पोलिसांकडून अचानकपणे होत असलेल्या तपासणीमुळे अवैध व्यावसायिकांचेही धाबे दणाणले आहेत. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून होणारी अवैध वाहतूक रोखण्याचे तसेच अपघातग्रस्त किंवा नादुरुस्त वाहनधारकांना मदत करण्याचे काम महामार्ग पोलिसांकडून करण्यात येते. कऱ्हाड येथे ढेबेवाडी फाट्यानजीक महामार्ग पोलिस चौकी आहे. या चौकीचा पदभार सहायक पोलिस निरीक्षक अजित सिद यांच्याकडे असून, येथे पस्तीस कर्मचारी कर्तव्यावर आहेत. तसेच या चौकीला एक जीपही देण्यात आली आहे. चौकीतील कर्मचारी दिवसभर शेंद्रे ते कासेगावपर्यंत जीपमधून गस्त घालत असतात. गस्तीवेळी अवैध वाहतुकीवर या कर्मचाऱ्यांचे लक्ष असते. तसेच अनेकवेळा अपघातस्थळी जाऊन वाहतूक सुरळीत करण्याचे व जखमींना उपचारार्थ रुग्णालयात पोहोचविण्याचे कामही महामार्ग पोलिस करतात. पोलिसांकडून महामार्गावरही वाहनांची तपासणी करण्यात येते. वाहनांच्या कागदपत्रांसह चालकाचा वाहन चालविण्याचा परवाना तपासला जातो. या कारवाईमुळे अवैध वाहतुकीला चाप बसतो. महामार्गावर होणारी ही तपासणी मोहीम आता राज्यमार्गावरही राबवण्यिास सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलिसांचे एक पथक महामार्गावर तर दुसरे पथक राज्यमार्गांवर वाहनांची तपासणी करीत आहे. राज्यमार्गावर तपासणी करताना घाटमार्गावरच जास्त वेळ पोलिस थांबून असतात. शहरानजीकच्या सुर्ली घाटाच्या सुरुवातीस पोलिसांचे पथक थांबलेले असते. त्यामुळे कडेगाव, कडेपूरहून येणारी तसेच कऱ्हाडहून कडेगाव, विटा बाजूस जाणारी वाहने पोलिसांना तपासता येतात. बेकायदा प्रवासी वाहतूक, वाहन चालविण्याचा परवाना, वाहनांची कागदपत्र आदींची तपासणी पोलिसांकडून केली जाते. घाटमार्गावर अनेकवेळा गुन्हेगारी कारवाया होतात. तसेच या मार्गावरून दारूची चोरटी वाहतूकही होते. हे प्रकार रोखण्यासाठीच महामार्ग पोलिसांनी तपासणीस सुरुवात केली आहे. आणखी काही दिवस ही मोहीम राबविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)गुन्हेगारी कारवायांना पायबंदपंढरपूर-गुहागर राज्यमार्गावर कऱ्हाडनजीक सुर्लीचा घाट आहे. या घाटात अनेक वळणे, दाट झाडी तसेच दरी आहे. या घाटमार्गात यापूर्वी अनेक गुन्हेगारी घटना घडल्या आहेत. स्थानिक पोलिसांची या मार्गावर गस्त असते. मात्र, दिवसातून एक किंवा दोन वेळाच पोलिसांची जीप या मार्गावरून जाते. एरव्ही या घाटाकडे कोणाचेही लक्ष नसते. त्यामुळे गुन्हेगार या संधीचा गैरफायदा घेतात. हेच लक्षात घेऊन महामार्ग पोलिसांनी घाट रस्त्यावर वाहनांची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. पोलिस दिसताच ‘यू टर्न’घाटमार्गात यापूर्वी वाहनांची तपासणी होत नव्हती. त्यामुळे अनेकजण बिनधास्तपणे या मार्गावरून वावरत होते. मात्र, दोन दिवसांपासून रस्त्यावर पोलिस उभे राहत असल्याने अवैध व्यावसायिकांना पळता भुई थोडी झाली आहे. अचानकपणे पोलिस समोर येत असल्याने काहीजण रस्त्यातच ‘यू टर्न’ घेऊन पाठीमागे जात आहेत. अशा काही वाहनधारकांचा पोलिसांनी पाठलाग केला. त्यावेळी संबंधित वाहनांची कागदपत्र अपुरी असल्याचे किंवा चालकाकडे लायसन्स नसल्याचे आढळून आले.