शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

वाईत होणार रस्ता रुंदीकरण

By admin | Updated: December 23, 2014 23:50 IST

वाहनचालकांना दिलासा : ‘लोकमत’च्या पाठपुराव्याला यश

वाई : नगरपालिकेने नेहमीची वाहतूक कोंडी टाळण्यासाठी यात्री निवासासमोरील वळणावरील वाडयाचा काही भाग संपादित करून तो हटविण्याचे कामकाज सुरू केल्याने नेहमी होणा-या वाहतूक कोंडीपासून नागरिकांना मुक्ती मिळणार आहे. वाईमध्ये वाहतुकीची कोंडी हा नित्याचा विषय झाला आहे. पाचगणी, महाबळेश्वर, मांढरदेव, धोम धरण अशा पर्यटन व धार्मिक स्थळे वाई शहरातून जोडली गेली असल्याने साहजिक मोठया प्रमाणावर रहदारी वाई शहरातून नेहमी होत असते. वाहतुकीच्या कोंडीमुळे भाविक, पर्यटक तसेच नागरिकांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागे. त्यांच्या वेळेचा अपव्यय होत होता. वाईमधील प्रसिध्द महागणपती मंदिर हे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी कृष्णा नदीच्या काठावर असल्याने अनेक पर्यटकांचा व भाविकांची वर्दळ या परिसरात असते. तसेच सकाळ-संध्याकाळ आॅफीस वेळेत मोठया प्रमाणावर रहदारी असते. त्यामुळे चित्रा टॉकीजच्या चौकापासून ते घोटवडेकर हॉस्पिटलपर्यंत नेहमी वाहतूक कोंडी होते. याच्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नगरपालिकेने हालचाली केल्याने रस्ता सरळ होऊन नेहमीच्या होणा-या वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न मिटणार आहे.(प्रतिनिधी)या परिसरात वाहतूकीची कोंडी नेहमी होत रस्ता रूंदिकरणासाठीनागरिकांकडून अनेक दिवसांपासूनची मागणी होत होती. नगरपालिकेने यात्री निवासासमोरील व्यावसायिकांनी रस्त्यावर बांधलेले कट्टे काढले असून येथे पार्किंगसाठी पट्टे मारण्यात येणार असल्याने या परिसरातील वाहतूक सुरळित होण्यास मदत होणार आहे. - आशा राऊत  --मुख्याधिकारी वाई नगरपालिका===वाईतील या वळणावर नेहमीच वाहतुकीची कोंडी होत होती. नगरपालिकेने जागा संपादित करून रस्ता रूंद केल्याने महागणपतीला येणा-या भाविकांना तसेच नागरिकांना या परिसरात होणा-या वाहतुकीच्या कोंडीपासून दिलासा मिळणार आहे.- अशोकराव पाटणे, व्यावसायिक