शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

फलटणमध्ये बेकायदेशीर बांधकामप्रकरणी आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:25 IST

फलटण: फलटण नगरपालिकेकडून नव्याने बांधण्यात आलेल्या राजधानी टॉवरमधील बेकायदेशीर बांधकाम व अतिक्रमण न हटविल्याच्या निषेधार्थ सोमवार, दि. २८ ...

फलटण: फलटण नगरपालिकेकडून नव्याने बांधण्यात आलेल्या राजधानी टॉवरमधील बेकायदेशीर बांधकाम व अतिक्रमण न हटविल्याच्या निषेधार्थ सोमवार, दि. २८ जूनपासून सर्व विरोधी नगरसेवकांसह मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा विरोधी नगरसेवकांनी दिला आहे.

याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे देण्यात आले आहे. याप्रसंगी विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक-निंबाळकर, गटनेते अशोक जाधव, सचिन अहिवळे, डॉ. प्रवीण आगवणे उपस्थित होते.

फलटण नगरपालिकेकडून नव्याने बांधण्यात आलेल्या राजधानी टॉवरमधील बेकायदेशीर बांधकाम व अतिक्रमणाबाबत आंदोलनाची नोटीस दि. १ जून रोजी आम्ही दिली होती. त्यावर मुख्याधिकाऱ्यांनी २० दिवसात संबंधित कार्यालयाची परवानगी न मिळाल्यास कारवाई करू, असे आश्वासन दिले होते.

याबाबत दि. २१ जून रोजी मुख्याधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता सहायक संचालक नगररचना, सातारा यांनी दि. १८ जून रोजीच्या पत्राने बांधकामास परवानगी दिली असल्याचे मुख्याधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यानंतर दि. २३ जून रोजी सहायक संचालक, नगररचना, सातारा यांनी दि. १८ जून रोजी दिलेली परवानगी रद्द समजण्यात यावी, असे पत्र मुख्याधिकाऱ्यांना व आम्हाला दिले आहे. त्यावरून बांधकाम हे बेकायदा असल्याचे सिद्ध होत असून, ते न हटविल्याने सोमवार, दि. २८ जूनपासून सर्व विरोधी नगरसेवक फलटण पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात बांधकाम काढले जात नाही, तोपर्यंत बेमुदत धरणे आंदोलनास बसणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.