शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:41 IST

सातारा : पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या कऱ्हाड तालुक्यातील खोडशी व वहागाव या ठिकाणच्या सहापदरीकरणासाठी मोजणीप्रक्रिया बुधवारी सुरू करण्यात ...

सातारा : पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या कऱ्हाड तालुक्यातील खोडशी व वहागाव या ठिकाणच्या सहापदरीकरणासाठी मोजणीप्रक्रिया बुधवारी सुरू करण्यात आली. ही मोजणीप्रक्रिया शेतकऱ्यांना विश्वासात न घेता व कसल्याही अधिकृत नोटिसा न देता भूमिअभिलेख व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी मोजणीला विरोध केला. तसेच भूमिअभिलेख व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या या मनमानी कारभाराविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा स्थानिक शेतकऱ्यांनी दिला आहे.

कऱ्हाड तालुक्यातील वहागाव व खोडशी परिसरातील या वाढीव भूसंपादनामुळे परिसरातील अनेकजण भूमिहीन व बेघर होणार असल्याने परिसरातील शेतकरी, बाधितांचा या भूसंपादन प्रक्रियेला पूर्वीपासून विरोध आहे. त्यासाठी बाधितांनी संबंधित प्रशासनाकडे वेळोवेळी लेखी हरकती, आक्षेप घेऊन आपले गाऱ्हाणे मांडले आहे, मात्र भूसंपादन विभागासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने शेतकरी व बाधितांना अंधारात ठेवून मनमानी पध्दतीने कारभार करीत असल्याने व संबंधिताकडून शेतकरीहिताची कसलीही ठोस कार्यवाही केली जात नसल्याने भूसंपादनाचा हा प्रश्न दिवसेंदिवस चिघळला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. तसेच परिसरातील वाढीव भूसंपादन रद्द करावे, या मागणीवर शेतकरी ठाम असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, बुधवारी खोडशी व वहागाव परिसरातील सहापदरीकरणासाठी संपादित केल्या जाणाऱ्या मोजणी प्रक्रियेविरोधात परिसरातील बाधितांनी भूमिअभिलेख, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पोलीस प्रशासन, तलाठी यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देऊन आपली भूमिका मांडली. भूमिअभिलेख व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या मनमानी कारभाराविरोधात शेतकरी उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे उपस्थित शेतकरी व बाधितांनी सांगितले. यावेळी रयत क्रांती संघटनेचे नेते सचिन नलवडे, अ‍ॅड. विक्रम कुलकर्णी, शंकर आतकरे यांच्यासह भूमिअभिलेख विभागाचे कर्मचारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे कर्मचारी, कऱ्हाड शहर व तळबीड पोलीास ठाण्याचे कर्मचारी, तसेच परिसरातील शेतकरी, बाधित व ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो ओळी : पुणे-बंगलोर महामार्गाच्या सहापदरीकरणासाठी संपादित केल्या जाणाऱ्या जमिनींच्या भूसंपादन प्रक्रियेविरोधात सचिन नलवडे, शंकर आतकरे यांच्यासह शेतकऱ्यांनी बुधवारी संबंधितांना निवेदन दिले.

फोटो नेम : 10वहागाव