शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:40 IST

खंडाळा : खंडाळा तालुक्यातील घाडगेवाडी येथे दोन महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. घोटभर पाण्यासाठी वणवण करत ग्रामस्थांना पाणी ...

खंडाळा : खंडाळा तालुक्यातील घाडगेवाडी येथे दोन महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. घोटभर पाण्यासाठी वणवण करत ग्रामस्थांना पाणी शोधावे लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी सुरू असलेली भटकंती थांबविण्यासाठी प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

तालुक्यातील घाडगेवाडी या ठिकाणी ऐन उन्हाळ्यात गेल्या दोन महिन्यांपासून पिण्याच्या पाण्‍याची टंचाई भासत आहे. वारंवार पंचायत समिती व तहसीलदारांच्याकडे मागणी करूनही टँकर देण्यात आला नाही. त्यामुळे पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. आपल्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत. मुळातच डोंगराच्या कडेला असणाऱ्या या गावात नेहमीच पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवते. त्यातच गावाला पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था नसल्याने उन्हाळ्याच्या चार महिन्यांत पाण्याची तीव्र टंचाई भासते. यावर्षी पाण्याची कमतरता असल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी ग्रामपंचायतीने प्रशासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे मात्र त्यावर अद्याप कार्यवाही झाली नसल्याने प्रश्न अधांतरीच आहे.

(कोट)

घाडगेवाडी गावाला प्रतिवर्षी पाण्याचा प्रश्न भेडसावतो. यासाठी ग्रामजल योजनेतून योजना राबणे आवश्यक आहे. सध्या एका विहिरीतून दुसऱ्या विहिरीत पाणी सोडले जाते. त्यानंतर गावच्या टाकीत पाणी जाते. यानंतर चार दिवसांतून लोकांना पाणी दिले जाते मात्र त्याचे प्रमाण कमी आहे पाण्यासाठी इतर दिवशी लोकांना यातना सहन कराव्या लागत आहेत.

- हिरालाल घाडगे, उपसरपंच, घाडगेवाडी

फोटो : ११ खंडाळा

खंडाळा तालुक्यातील घाडगेवाडी येथे पाणीटंचाई भासू लागली असून, ग्रामस्थांना विहिरीवरून पाणी आणावे लागत आहे.