शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
5
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
6
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
7
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
8
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
9
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
11
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
12
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
13
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
14
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
15
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
16
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
17
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
18
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
19
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
20
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

वडापच्या जीवघेण्या स्पर्धेत प्रवाशांचा जीव टांगणीला

By admin | Updated: July 27, 2014 23:07 IST

धोकादायक रस्त्यांवर वाहने भरधाव- अनेक चालकांचे मद्यपान

तारळे : तारळे - नागठाणे रस्त्यावर वडापच्या शर्यतीत प्रवाशांचा जीव टांगणीला लागत आहे़ तसेच या मार्गावर कोंजवडे फाट्यानजीक अपघाती वळण असल्याने या वळणावरही मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वडापचालकांना शिस्त लावण्याबरोबर चालकाचा परवाना तपासण्याची मोहीम पोलिसांनी राबविणे गरजेचे आहे़ कोंजवडे फाट्यावरील वळणावर काही दिवसांपूर्वी प्रवासी वाहतूक करणाऱ्या उभ्या जीपला दुसऱ्या वडाप जीपने जोरदार धडक दिली़ याठिकाणी वारंवार असे प्रकार घडत असले तरी त्यातून काहीच बोध न घेता अतिउत्साही चालकांकडून भरधाव वेगात व बेदरकारपणे वाहने चालविली जात आहेत. कोंजवडे येथील मुख्य चौकातून नागठाणे, मुरबाड, कडवे यासह तारळे विभागातील रहदारी मोठ्या प्रमाणात होते. संबंधित मुख्य चौकानजीक धोकादायक वळण असून, त्यालगत रुंद ओढा आहे़ ओढ्यात संपूर्ण खडक असल्याने संरक्षक कठड्याआभावी व खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्या चुकीच्या पद्धतीने उभ्या केल्या जात असल्याने दुर्घटना घडण्याची शक्यता आहे़तारळे विभागात अनेक अपघात घडले आहेत. काही अपघातांची पोलीस दप्तरी नोंद होते़ तर काही प्रकरणे तडजोडीने मिटवली जातात़; पण या अपघातातून चालक मात्र काहीच बोध घेताना दिसत नाहीत़ परिणामी गरजेपोटी खासगी वाहनातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरू आहे़ (वार्ताहर)अनेक चालकांचे मद्यपानतारळे विभागात नागठाणे, काशीळ अशा ठिकाणी जाण्यासाठी शेकडो खासगी जीप आहेत़ तसेच अनेक चालक मद्यपान करून गाड्या चालवत असल्याचे चित्र दिसून येते़ सर्व नियम धाब्यावर बसवून धोकादायक पद्धतीने वाहतूक केली जात आहे़ त्यावर चाप बसवणे गरजेचे आहे़ मूठभर चालकांमुळे इतर चालकांना मनस्ताप होणार असेल तर त्याच्या चालकांवर इतर चालकांनी जरब बसविणे गरजेचे आहे़