शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

नवीन प्रांतासाठी वाईकरांना करावी लागणार प्रतीक्षा

By admin | Updated: July 29, 2014 23:02 IST

तहसीलदारही नवीन येणार : विद्यार्थ्यांचे होतेय नुकसान

सातारा / वाई : वाईचे प्रांताधिकारी सूरज वाघमारे यांची बदली झाली आहे. परिणामी वाईकरांना विविध दाखले मिळविण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, वाईकरांना विधानसभा निवडणुकीपूर्वी नवीन प्रांताधिकारी मिळणार आहे. त्यामुळे वाईकरांना आणखी एक महिनाभर तरी नवीन प्रांताची प्रतीक्षा करावी लागणार आहे. विशेष म्हणजे तहसीलदारही नवीन येणार आहेत.सातारा जिल्ह्यात यापूर्वी फक्त वाई, फलटण, कऱ्हाड, सातारा हे चारच उपविभाग होते. मात्र, यानंतर जिल्ह्यात कोरेगाव, कऱ्हाड, पाटण, वाई, माण आणि सातारा असे उपविभाग झाले. यानंतर काही प्रांताधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या तर काहींच्याकडे अतिरिक्त कार्यभार देण्यात आला. यास आता वर्ष उलटून गेले. त्यानंतर प्रत्येक विभागाला नवीन प्रांताधिकारी आले. मात्र, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वाईचे प्रांताधिकारी आणि तहसीलदारांची बदली अपेक्षितच होती. पहिली बदली प्रांताधिकाऱ्यांची झाली आहे. आता तहसीलदारांची बदली होणार आहे. मात्र, महिना झाले तरी नवीन प्रांताधिकारी वाईला मिळाली नसल्यामुळे वाई, महाबळेश्वर तालुक्यातील अनेकांची कामे खोळंबली आहेत.वाई उपविभागात वाई आणि महाबळेश्वर तालुक्याचा समावेश आहे. दोन्ही तालुक्याचा बहुतांशी भाग डोंगराळ आहे. मुख्यालय वाई असल्यामुळे दोन्ही तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेला वाई येथेच यावे लागते. त्यातच अजूनही काही जुन्या कागदपत्रांसाठी खंडाळा तालुक्यातील लोकांना वाई प्रांताधिकारी कार्यालयातच यावे लागते. मात्र, त्यांनाही आवश्यक ते दाखले प्रांताधिकारी नसल्यामुळे मिळत नाहीत.गेले महिनाभर प्रांताधिकारी नसल्यामुळे वाई आणि महाबळेश्वर तालुक्यातील असंख्य विद्यार्थ्यांना दाखले मिळालेले नाहीत. ज्यांना तात्पुरता कार्यभार दिला आहे, ते अनेकदा दाखल्यांवर सह्या करण्यास होकार देत नाहीत. कायदेशीर बाबी पुढे करून तेही हात झटकत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अडचणीत आणखी भर पडू लागली आहेत. दरम्यान, लवकरच नवीन प्रांताधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी आता वाई, महाबळेश्वर तालुक्यांतून जोर धरू लागली आहे.जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुका जाहीर होईपर्यंत तरी वाई उपविभागाला प्रांताधिकाऱ्यांसाठी प्रतीक्षाच करावी लागणार आहे. त्यातच तहसीलदारांचाही तीन वर्षांचा कार्यकाल संपल्यामुळे त्यांची बदली होणार आहे. (प्रतिनिधी)