शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

तलावातील गाळ काढण्यासाठी एकवटले ग्रामस्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2016 00:10 IST

म्हावशीत लढा दुष्काळाशी : दीडशे एकर क्षेत्र येणार ओलिताखाली; दुष्काळ कायमचा हटविण्याची प्रतिज्ञा

खंडाळा : तालुक्यातील दुष्काळसदृश परिस्थितीमुळे पाणीटंचाईचे भीषण संकट ओढवले आहे. यावर मात करण्यासाठी म्हावशी, ता. खंडाळा येथील ग्रामस्थ पुढे सरसावले आहेत. लोकसहभागातून गावच्या तलावातील गाळ काढून पाणीसाठवण क्षमता वाढविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. प्रशासनावर अवलंबून न राहता गावच्या समस्येसाठी गावकऱ्यांचे श्रमदान आणि आर्थिक योगदानातून जलसंधारणाचे सुरू केलेले काम तालुक्यासाठी आदर्शवत ठरत आहे.म्हावशी गाव सामाजिक उपक्रमांसाठी नेहमीच अग्रभागी राहिले आहे. गावचे सुशोभीकरण, वृक्ष लागवड, क्रीडांगण यासाठी तरुणांनी पुढाकार घेऊन काम केले आहे. यावर्षी गावच्या परिसरातील विहिरींच्या पाणीपातळीत लक्षणीय घट झाली. पिण्याच्या पाण्यावर गावकऱ्यांनी टंचाईमुक्तीसाठीही प्रयत्न केले.मात्र, यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी गावातील लोकांनी मिळून गावची वर्गणी जमा केली. त्यातून तलावातील गाळ काढून त्याची साठवण क्षमता वाढविण्याचे काम सुरू केले. त्यामुळे म्हावशी गावातील सुमारे १०० ते १५० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. शिवाय पाणीसाठवणामुळे परिसरातील विहिरींचीही पाणीपातळी वाढीस लागेल.ग्रामस्थांचे योगदान, गावच्या हद्दीतील कंपन्यांचे सहकार्य आणि प्रशासनाच्या मदतीने हे मोठे काम पूर्णत्वास जाणार आहे. गाळ काढण्याच्या या मोहिमेचा शुभारंभ तहसीलदार शिवाजीराव तळपे यांच्या हस्ते झाला. यावेळी गावच्या सरपंच स्वाती माळी, उपसरपंच विठ्ठल राऊत, महेश राऊत, शिवाजी माळी, मंडलाधिकारी एन. सी. महाडिक, गावकामगार तलाठी जोतिराम दगडे, शारदा राऊत, तुळशीराम राऊत, बंडूतात्या राऊत, बाळू राऊत, दत्तात्रय गाढवे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावच्या यात्रेचा खर्च वाचवून जलसंधारणासाठी खर्च करणारे हे तालुक्यातील पहिले गाव आहे. त्यामुळे हे काम इतरांना प्रोत्साहित करणारे आहे. (प्रतिनिधी)पाणीटंचाईवर मात करण्यासाठी म्हावशी ग्रामस्थांनी उचललेले पाऊल इतर गावांना प्रेरणादायी आहे. गावच्या लोकसहभागाला प्रशासनाचे सहकार्य राहील. जलसंधारणाची इतरही कामे हाती घेऊन शाश्वत पाणीसाठा निर्माण करता येईल. त्यासाठी लोकांनी पुढे यावे. - शिवाजीराव तळपे, तहसीलदार, खंडाळाखंडाळा तालुक्यातील म्हावशी येथे तहसीलदार शिवाजीराव तळपे यांच्या उपस्थितीत तलावातील गाळ काढण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला.