शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

विद्यानगरला वाढली कचऱ्याची डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 14:56 IST

ठिकठिकाणी ढीग : नागरीकांचे आरोग्य धोक्यात

आॅनलाईन लोकमतविद्यानगर (जि. सातारा), दि. २२ : दिवसेंदिवस विद्यानगरसह सैदापुरची वाढ झपाट्याने होत असल्याने कचऱ्याची समस्या गंभीर बनत आहे. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यास सैदापुर ग्रामपंचायतीची यंत्रणा अपुरी पडत असल्याचे दिसून येत आहे. कऱ्हाड शहराचे उपनगर म्हणुन विद्यानगरकडे पाहिले जाते. शिक्षणासाठी आलेले विद्यार्थी, व्यावसायिक, दुकानदार, लहानमोठे व्यवसायीक आदींना कचऱ्याची समस्या भेडसावत आहे. ग्रामपंचायत कचरा गोळा करते; पण त्यासाठी यंत्रणा अपुरी आहे. कऱ्हाड-मसुर रस्त्यालगत कचऱ्याचे ढीग दिसत आहेत. त्याचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कचऱ्याची विल्हेवाट कशी आणि कुठे लावायची, हा प्रश्न ग्रामपंचायतीसमोर आहे. ओगलेवाडी रस्त्याचीही तीच अवस्था असुन त्याही ठिकाणी कचरा दिसुन येत आहे. कचऱ्यामध्ये कागदी बॉक्स, प्लास्टीकच्या टाकाऊ वस्तू, वैद्यकीय साहित्याचे बॉक्स आदीचा समावेश आहे. सैदापूर ग्रामपंचायतीकडून कृष्णा नदीपात्रालगत कचरा टाकला जातो. मात्र, हा प्रकारही गंभीर आहे. संबंधित कचऱ्यामुळे नदीपात्र दुषित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ग्रामपंचायतीने कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी नागरीकांतून केली जात आहे.