शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
3
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
4
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
5
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
6
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
7
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
8
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
9
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
10
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
11
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
12
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
13
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
14
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
15
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
16
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
17
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
18
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
19
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
20
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला

झेब्रा क्रॉसिंग पादचाऱ्यांना की वाहनांना ?

By admin | Updated: February 10, 2015 23:58 IST

सुरक्षितता धोक्यात : चौकाचौकात नियमांचे उल्लंघन..!

सातारा : वाहतुकीच्या गर्दीतून पादचाऱ्यांनाही सुरक्षित रस्ता ओलांडण्यासाठी झेब्रा क्रॉसिंगचा वापर करतात हे क्रॉसिंग शक्यतो वाहतूक सिंग्नल चौकात असतात; परंतु नेहमीच सिग्नल ठिकाणी वाहनेच या क्रॉसिंगवर उभे राहतात. त्यामुळे झेब्रा क्रॉसिंग मार्ग हा पादचाऱ्यांना की वाहनांना असा प्रश्न पडत आहे. तर दुसरीकडे भर चौकातच वाहनधारक नियमांचे उल्लंघन करत असून देखील त्यांच्यावर कारवाई होत नाही.वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतुकीचे नियम काटेकोरपणाने पाळणे बंधनकारक आहे. जो कोणी याचे उल्लंघन करेल त्याला दंडात्मक शिक्षा वाहतूक पोलिसांकडून केली जाते. त्याचाच हा भाग आहे की झेब्रा क्रॉसिंग फक्त पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी असतो. सिग्नल लागताच पादचारी या मार्गाचा वापर करतात; परंतु शहरातील काही चौकात झेब्रा क्रॉसिंगवरच वाहने थांबतात. त्यामुळे पादचारी रस्ता कसा ओलांडणार, हा प्रश्न आहे.दरम्यान, सातारा शहरात वाहतुकीची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना आता रस्त्यावरूनही चालणे अवघड झाले आहे. पादचाऱ्यांसाठी फुटपाथ बांधली आहे. परंतु फुटपाथवर विक्रेते, जाहिरातीचे फलक, अतिक्रमण व वाहनांची पार्किंग यांचेच अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे पादचाऱ्यांच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा परिषदेसमोर नव्याने सुरू झालेली सिग्नलयंत्रणा खूप महत्त्वाची आहे. या ठिकाणी शाळा व विविध शासकीय कार्यालय व हॉस्पिटल आहेत. त्यामुळे सतत पादचाऱ्यांची वर्दळही येथे असते. यासाठी पादचाऱ्यांच्या सोयीसाठी येथे झेब्रा क्रॉसिंगची सोय केली आहे. परंतु याच क्रॉसिंगवर वाहने थांबतात. त्यामुळे पादचाऱ्यांना नेमका रस्ता कसा पास करावा, असा प्रश्न आहे. वाहतूक पोलिसांनीही याकडे दुर्लक्ष केल्याने एक प्रकारे वाहतुकीचे उल्लंघन करणाऱ्या या वाहनधारकांवर कारवाई का होत नाही, अशी विचारणा पादचाऱ्यांकडून होत आहे. (प्रतिनिधी)जागृती आवश्यकवाहतुकीच्या नियमांविषयी अद्यापही वाहनचालक आणि पादचाऱ्यांमध्ये पुरेशी जागरूकता नसल्याचे चित्र दिसते. म्हणूनच झेब्रा क्रॉसिंगच्या अलिकडे गाडी किती लावायची आणि पादचाऱ्यांसाठी किती जागा ठेवायची याविषयी माहिती देवून जागृती होणे आवश्यक असल्याचे चित्र दिसते.नगरपालिका व वाहतूक शाखेने पादचाऱ्यांसाठी निर्माण केलेले फुटपाथ व झेब्रा क्रॉसिंग रिकामे करून द्यावे. वाहतुकीच्या वर्दळीत पादचाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे नियमाचेच पालन पालिका व पोलिसांनी करावे.- गणेश भोसले, सदर बझार, सातारा