शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

वडूज नगरपंचायतीने स्वतंत्र कोरोनो हॉस्पिटल उभारावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:39 IST

वडूज : वडूज शहरात कोरोनाने उच्छाद मांडला असताना शहरातील लोकप्रतिनिधी व नगरपंचायत प्रशासन गांधीगिरीच्या भूमिकेत आहेत. यांनी येत्या ...

वडूज : वडूज शहरात कोरोनाने उच्छाद मांडला असताना शहरातील लोकप्रतिनिधी व नगरपंचायत प्रशासन गांधीगिरीच्या भूमिकेत आहेत. यांनी येत्या पाच दिवसात डोळ्यावरची पट्टी काढली नाही तर नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांच्यासह मुख्याधिकारी यांना आयसोलेशन सेंटरमध्ये कोंडून ठेवण्याचा इशारा नगरपंचायतीचे विरोधी पक्षनेते शहाजीराजे गोडसे यांनी दिला आहे.

कोरोनोच्या दुसऱ्या लाटेने वडूज शहरात धुमाकूळ घातला असताना शहरातील नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सत्ताधारी नगरसेवक, नगरसेविका, मुख्याधिकारी हे चूल धरून घरात बसले आहेत. वर्षभरात कचरा टेंडरसाठी स्वतंत्र बैठक झाली. परंतु कोरोनोसाठी एकही बैठक नगराध्यक्षांनी बोलावली नाही. वडूज शहरातील नागरिकांना हक्काचे बेड उपलब्ध न झाल्यामुळे मृत्यूने थैमान घातले आहे. वास्तविक यापूर्वी नगरपंचायतीने १४व्या वित्त आयोगातून, नगरपंचायत फंडातून किंवा करापोटी जमा झालेल्या विकास शुल्कमधून वडूज शहरासाठी स्वतंत्र कोरोनो हॉस्पिटल उभारणे गरजेचे होते. सध्या शहरातील नागरिकांना बेड मिळवण्यासाठी सातारा, कर्‍हाड, फलटण आदी ठिकाणी धडपड करावी लागत आहे. दोन वर्षांपूर्वी आम्ही आमच्या मित्रमंडळातर्फे जन आंदोलनाचा हिसका दाखवल्यानंतर नगरपंचायतीने नवीन शववाहिका वडूजकरांच्या सेवेत सुरू केली. आता नगरपंचायत या शववाहिकेसाठी वडूजमधील नागरिकांकडून अंत्यविधीसाठी कररुपी पावती घेत आहे. यावरून सत्ताधारी लोकप्रतिनिधींचा नाकर्तेपणा व उदासीनता दिसून येत आहे.

शहरातील नागरिकांना हॉस्पिटल हे युद्धभूमी वाटत असताना नगरपंचायत ही केवळ दिखाव्याच्या कामावर खर्च करत आहे. नगरपंचायतीने नवीन कोरोनो हॉस्पिटल उभारून शहरातील डॉक्टरांना सेवा देण्यासाठी साद घातली पाहिजे. तरच शहरातील नागरिकांचे हाल कमी होऊन मृत्यूचे प्रमाण कमी होणार आहे. नगरपंचायतीने येणाऱ्या पाच दिवसात हॉस्पिटल उभारले नाही तर होणाऱ्या परिणामांना सामोरे जावे, असा गर्भित इशारा शहाजीराजे गोडसे यांनी दिला आहे.

(कोट)

गटारे, रस्ते, स्मशानभूमी, थायमास लॅम्प, कचरा टेंडर अशा मलईदार कामांमध्ये कायम व्यस्त राहणाऱ्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांना वडूजमधील नागरिकांचे हाल होत असतानादेखील पाझर फुटत नाही. या महामारीच्या काळात नगरपंचायत प्रशासन पूर्णतः असफल झाले असून, त्यांना खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही. त्यामुळे सामाजिक नैतिकता म्हणून संबंधितांनी राजीनामे द्यावेत.

- विजय गोडसे, नागरिक, वडूज