शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटनस्थळाचा विकासासाठी वापर व्हावा

By admin | Updated: August 30, 2015 21:53 IST

शरद पवार : हॉटेल प्रीती एक्झिक्युटिव्ह अ‍ॅण्ड नरिमन टॉवर कमर्शिअल कॉम्प्लेक्सचे साताऱ्यात शानदार उद्घाटन

सातारा : ‘नव्या पिढीला आयटी कॉल सेंटर साताऱ्यात उभारण्याचा निर्णय खरोखरच कौतुकास्पद आहे. साताऱ्याला ऐतिहासिक आणि जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळाचा वारसा लाभला आहे. त्याचा योग्य वापर व्यवसायासाठी व्हावा,’ असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले.पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गालगत उभारण्यात आलेल्या स्टार कॅटॅगरीत असणाऱ्या ‘हॉटेल प्रीती एक्झिक्युटिव्ह अ‍ॅण्ड नरिमन टॉवर’ या कमर्शिअल कॉम्प्लेक्सचे उद्घाटन माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.यावेळी उद्योजक फरोख कूपर, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, आमदार प्रभाकर घार्गे, आमदार शशिकांत शिंदे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील, आमदार दीपक चव्हाण, आमदार दीपक साळुंखे, माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर, जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, उपाध्यक्ष रवी साळुंखे, दादाराजे खर्डेकर, अनिल देसाई, सुनील माने, प्रीती घार्गे, प्रिया घार्गे आदी उपस्थित होते. खासदार शरद पवार म्हणाले, ‘आमदार प्रभाकर घार्गे यांनी आपल्या दोन्ही मुलींच्या हातात व्यवसायाची जबाबदारी दिली असून, त्यांनी मुलींचे कतृत्व ओळखले आहे. कारण मुलींमध्ये इतिहास घडविण्याची ताकद असते.’ आ. प्रभाकर घार्गे म्हणाले, ‘मी राजकारणात असलो तरी व्यवसायाची कर्मभूमी सातारा आहे. हे मी कधीही विसरलो नाही. साताऱ्यात स्टार कॅटॅगरीचे हॉटेल आवश्यक होते. त्याची पूर्तता मी केली आहे. साताऱ्यात येणारे परदेशी पर्यटक पुण्याला जात होते. नरिमन हे फरोख कूपर यांच्या वडिलांचे नाव आहे. त्यामुळेच मी हे नाव दिले आहे.’ खा.विजयसिंह मोहिते-पाटील, फरोख कूपर, आ. शशिकांत शिंदे, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. प्रिया घार्गे, प्रीती घार्गे यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)