शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

उगवण क्षमता पाहून सोयाबीनचे घरचेच बियाणे वापरावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:39 IST

वाई : ‘खुल्या बाजारात सोयाबीनची विक्री दरवाढ झाल्यामुळे या वर्षी खरीप हंगामात सोयाबीन बियाण्याचे दरही मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्‍यता ...

वाई : ‘खुल्या बाजारात सोयाबीनची विक्री दरवाढ झाल्यामुळे या वर्षी खरीप हंगामात सोयाबीन बियाण्याचे दरही मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी येणाऱ्या खरीप हंगामात सोयाबीनचे घरचेच बियाणे वापरणे फायदेशीर ठरेल,’ असे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी हरिश्चंद्र धुमाळ यांनी केले.

केंजळ परिसरात सोयाबीन बियाणे उगवणक्षमता चाचणी प्रात्यक्षिक प्रसंगी ते बोलत होते. या वेळी कृषी पर्यवेक्षक भाऊसाहेब शेलार, कृषी सहायक सुनील फरांदे, विक्रम मोहिते आणि शेतकरी उपस्थित होते.

धुमाळ म्हणाले, ‘शेतकरी मिळेल ते बियाणे वापरतात, त्याचा परिणाम सोयाबीनच्या उत्पादनावर होतो. त्यामुळे असे बियाणे वापरण्यापूर्वी उगवणक्षमता चाचणी घेतली तर योग्य बियाणे वापरले जाऊन भविष्यात खराब बियाणे वापरल्यामुळे उत्पादनामध्ये होणारे नुकसान टाळता येईल आणि उत्पादन खर्चामध्येही बचत करता येणे शक्‍य होईल. सोयाबीन बियाणे उगवणक्षमता चाचणी घेत असताना घरचे शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेल्या बियाण्यातून मूठभर बियाणे घ्यावे. त्यातून शंभर दाणे स्वच्छ धुतलेल्या व ओल्या केलेल्या गोणपाटाच्या अर्ध्या भागात दहाच्या संख्येने दहा ओळींत पसरावेत. प्रत्येक दाणा व ओळीमध्ये एक इंच अंतर ठेवावे. त्यानंतर पाच ते सहा दिवस त्यावर पाणी शिंपडावे. १०० पैकी ७० ते ८० बियाणे अंकुरित झाल्यास एकरी ३० किलो, ६० ते ७० दाण्यांना ३५ ते ४० किलो बियाणे पेरावे. ६० पेक्षा कमी बियाणे अंकुरित झाल्यास असे बियाणे वापरू नये.’