शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वाईजवळ ब्रिटीश कालीन झाडांच्या बुंध्यावर रासायनिक पदार्थांचा प्रयोग

By admin | Updated: April 11, 2017 12:45 IST

पर्यावरणावर घाला : सुरूरजवळ आठ वृक्षांच्या बुंध्यांना आग

आॅनलाईन लोकमतवाई : वाई-सुरूर रस्त्यावर दुतर्फा असणाऱ्या ब्रिटीशकालीन झाडांच्या बुंध्यात ज्वालाग्राही रसायनांच्या मदतीने आग लावण्याचे प्रकार समाजकंटकांकडून घडत आहेत. उन्हाळ्याची तीव्रता प्रचंड वाढल्याने ओल्या झाडांनाही त्वरित आग लागत आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमींमधून संतापाची लाट उसळली आहे. सुरूर रस्त्यावरील पेट्रोल पंपाजवळ वडाच्या सात ते आठ मोठ्या झाडांच्या बुंद्यांना आग लावण्यात आली होती. वाईतील पर्यावरण प्रेमींनी झाडाच्या बुंध्यात लागलेली आग विझवून झाडाला जीवदान दिले आहे. त्यावेळी संबंधित विभागाने संबंधित समाज कंटाकांना शोधून कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. सद्या झाडे तोडण्याचे प्रमाण प्रचंड वाढल्याने जंगल संपत्ती नष्ट होत आहे. दिवसेंदिवस सूर्य आग ओकत असल्याने तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. तरीही संबंधित विभागाकडून यावर कोणताही उपाय करण्यात आला नाही. त्यामुळे दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत असून त्याचा परिणाम पर्जन्यमान व जीवसृष्टीवर होत आहे. झाडे नष्ट होण्याचे प्रमाण वाढल्याने निसर्ग कोपला असल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे. निसर्ग संपत्ती नाहीशी झाल्याने पर्यावरणाचा ऱ्हास होऊन जमिनीची धूप वाढत आहे. मानवाचे निसर्गावर होणारे आक्रमण वाढत चालल्याने दुष्काळासारख्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. या वर्षी सध्या संपूर्ण महाराष्ट्राला अनेक ठिकाणी पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. वेळीच समाज प्रबोधन झाले नाही तर हे दुदैर्वी प्रकार दिवसेंदिवस वाढतच राहणार आहेत. वन विभाग व बांधकाम विभागांनी एकत्रितपणे कारवाई करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. समाजातील काही घटकांनी, पर्यावरण प्रेमींनी या विभागाला सहकार्य केल्यास हे प्रकार त्वरित थांबू शकतात. ओल्या झाडाला आग लावून नष्ट करण्याचा हा प्रकार दुदैर्वी असून तो थांबण्यासाठी सर्वांनी एकत्रीतपणे पुढे येण्याची गरज आहे. तसेच बांधकाम विभागाने रस्ते रुंदीकरणात झाडे हटविण्यापेक्षा ती स्थलांतरित करून नव्याने लावण्याचा प्रयत्न केल्यास त्यातून समाजाला एक दिशा मिळून अशा प्रकारांना आळा बसण्यासाठी मदत मिळेल. (प्रतिनिधी)कावळ्यांचा हकनाक बळीसमाजकंटकांनी लावलेल्या आगीत या झाडांवरील कावळ्यांचे अनेक घरटी जळाली. यामध्ये एका कावळळ्याचा हकनाक बळी गेला.