शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘उरमोडी’तून पाणी सोडले

By admin | Updated: July 30, 2014 23:18 IST

पावसाचा जोर वाढला : कोयना धरणात ६१.५२ टीएमसी पाणी

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात मध्यरात्रीनंतर पावसाचा जोर वाढला. धरण पाणलोट क्षेत्रात संततधार वाढल्यामुळे पाणीसाठाही वाढू लागला आहे. कोयना धरणात बुधवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत ६१.५२ टीएमसी इतका पाणीसाठा झाला होता. दरम्यान, उरमोडी पाणलोट क्षेत्रात जोरदार सरी कोसळत असल्यामुळे आणि येवा वाढल्यामुळे धरणातून नदीपात्रात प्रतिसेकंद २००० क्युसेक पाणी सोडले आहे. परिणामी नदीकाठावरील गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. पाटण /कोयनानगर : जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. खास करून धरण पाणलोट क्षेत्रात संततधार कायम असल्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. कोयना धरणात गेल्या ३६ तासांत ५.३५ टीएमसी इतका पाणीसाठा वाढला असून, सांयकाळी सहा वाजेपर्यंत झालेला साठा ६१.५२ टीएमसी इतका होता. मंगळवारी सकाळी आठ वाजता धरणात ५६.१८ टीएमसी इतका पाणीसाठा होता.परळी : उरमोडी धरणक्षेत्रात जोरदार सरी कोसळत असल्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. बुधवारी सायंकाळी सहा वाजता धरणात ८.८९ टीएमसी इतका पाणीसाठा झाला होता. धरण व्यवस्थापनाने दुपारी बारा वाजल्यानंतर धरणाच्या दरवाजातून प्रतिसेकंद २००० क्युसेक इतके पाणी नदीपात्रात सोडले. यामुळे उरमोडी नदी तिरावरील सुमारे १४ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तारळे : तारळीची पाणीसाठवण क्षमता ५.८५ टीएमसी असून, आजमितीस ४.८९ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. धरणातून ३,१८२ क्युसेक पाणी नदीपात्रात सोडले आहे.वाई : बुधवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत धोम धरणात ७.५६, कण्हेर धरणात ८.०२, बलकवडी धरणात ३.१४ टीएमसी इतका पाणीसाठा झाला होता. (प्रतिनिधी)महाबळेश्वरला सर्वाधिक पाऊस..!जिल्ह्यात गेल्या २४ तासांत एकूण २३.१ मिमी पावसाची नोंद झाली असून, आजअखेर झालेला पाऊस ६२१९.५ मिमी तर तालुकानिहाय सरासरी ५६५.४ मिमी इतकी आहे. जिल्ह्यात सर्वाधिक १२३.२ मिमी पावसाची नोंद महाबळेश्वर तालुक्यात झाली आहे. गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात २५३.७ मिमी पाऊस झाला. सकाळी आठ वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आजअखेर झालेला पाऊस मिमीमध्ये असा : सातारा २०.४ (४८१.५), जावळी ४६.२ (७७६.८), कोरेगाव ४.७ (१६१.६), कऱ्हाड ८.३ (३०५.६), पाटण ३४.१ (८१३.२), फलटण ०.९ (६४.४), माण ०.८ (९१.९), खटाव ३.२ (१७७.३), वाई ९.४ (२१८.२), महाबळेश्वर १२३.२ (२९९५.३), खंडाळा २.५ (१३३.७)