शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

उंडाळकर हे राज्यातील आदर्शवत नेतृत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:31 IST

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी सहकारमंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी व कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार उंडाळे येथे ...

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी सहकारमंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी व कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार उंडाळे येथे आले होते. त्यावेळी ते बोलत होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहराज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, कोल्हापूरचे आमदार पी. एन. पाटील-सडोलीकर, चंदगडचे आमदार राजेश पाटील, आमदार शशिकांत शिंदे, सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील माने, मनोहर शिंदे, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील, माजी पोलीस उपायुक्त रामराव पवार, कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब यादव यांच्यासह मान्यवरांनी शनिवारी उंडाळे येथे प्रत्यक्ष भेटून अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांचे सांत्वन केले. तसेच श्रद्धांजली वाहिली.

यावेळी अजित पवार म्हणाले, कऱ्हाड दक्षिणच्या डोंगरी भागात ज्या सहकारी संस्था उंडाळकरांनी उभ्या केल्या त्या आदर्शवत असून जिल्हा बँकेतही त्यांचे काम गौरवास्पद आहे. रयत सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम त्यांनी केले. सहकारी सोसायटी व शेतकरी केंद्रबिंदू मानून त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. त्यांचा सहकार, सामाजिक, शिक्षण क्षेत्रातील वारसा पुढे चालवणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल.

प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही श्रद्धांजली वाहताना विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या कार्याचा गौरव केला.

दरम्यान, आमदार उल्हास पवार, चंदगडचे माजी आमदार आनंदराव पाटील, सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, श्रमिक मुक्ती दलाचे भारत पाटणकर, कऱ्हाडचे उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, शिवराज मोरे, शिक्षक नेते संभाजीराव थोरात, माधवराव पाटील, मुंबई जिल्हा उपनिबंधक जे. डी. पाटील, नागपूर कामगार आयुक्त नितीन पाटणकर, माजी पोलीस महानिरीक्षक रामराव पवार, माजी शिक्षण सभापती संजय देसाई यांच्यासह मान्यवरांनी उपस्थित राहून रयत कारखान्याचे अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. उदयसिंह पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. आनंदराव पाटील यांचे सांत्वन केले.

फोटो : ०९केआरडी०९

कॅप्शन : उंडाळे (ता. कऱ्हाड) येथे निवासस्थानी भेट देऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजीमंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.