शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

उदयनराजेंचा हिशेब रामराजेंनी केला चुकता !

By admin | Updated: March 30, 2015 00:11 IST

विधान परिषदेच्या सभापतिपदी निवड झाल्यानंतर फलटण तालुक्यातील सभेत त्यांनी उदयनराजेंच्या कार्यपद्धतीचे वाभाडे काढले.

सातारा/वाठार निंबाळकर : गेल्या काही दिवसांपासून अजित पवार व रामराजे यांच्यावर सडकून टीका करणाऱ्या खासदार उदयनराजे भोसले यांचा हिशेब रामराजे नाईक-निंबाळकर यांनी रविवारी चुकता केला. विधान परिषदेच्या सभापतिपदी निवड झाल्यानंतर फलटण तालुक्यातील सभेत त्यांनी उदयनराजेंच्या कार्यपद्धतीचे वाभाडे काढले.विडणी (ता. फलटण) येथे श्रीराम कारखान्याच्या निवडणूक प्रचार सभेत रामराजे म्हणाले की, ‘छत्रपती जर छत्रपतींसारखे वागले, तरच सभापती सभापतींसारखे वागतील. छत्रपतींना खासदारकी विनासायास मिळाली. १९९६ मध्ये फलटणच्या राजघराण्यानेच यांना राजकारणात आणले, अन्यथा हे राजकारणात दिसलेच नसते. पंधरा वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत सातारा शहरात साधी एक गटार तरी यांनी बांधलीय का? ज्या प्रमाणे पंतप्रधान मोदींनी काँग्रेसमुक्त देश करण्याचा विडा उचलला, त्याप्रमाणे संबंधित नेतामुक्त जिल्हा करण्यासाठी प्रयत्न करू.’ ‘सातारा जिल्ह्यातील विद्यमान खासदार व माजी खासदार यांच्या पाण्याचा संबंध फक्त बाटलीपुरताच येतो. ते आज पाणी चोरीची भाषा करत असून जिल्हा बँकेत शिरण्यासाठी शिवसेनेच्या पालकमंत्र्यांसोबत पॅनेल करण्यासही तयार झाले आहेत. ज्यांनी आजपर्यंत बाटलीपुरतेच तोंड उघडले, अशा लोकप्रतिनिधींना यापुढे फलटण-खंडाळा तालुक्यातील एकही मत मिळू देणार नाही,’ असाही घणाघात यावेळी रामराजे यांनी केला. उदयनराजे थांबले की मी बोलतो!महिन्यापूर्वी रामराजे यांनी ‘अतिरिक्त पालकमंत्री’ म्हणून उदयनराजेंचा उल्लेख केला होता. त्यानंतर उदयनराजेंनी रामराजेंच्या विरोधात सातत्याने जोरदार टीका केली होती. मात्र, त्यावेळी रामराजेंनी ‘लोकमत’शी बोलताना आपली भूमिका जाहीर केली होती की, ‘उदयनराजे ज्या दिवशी बोलायचे थांबतील, त्याच दिवसापासून मी उत्तर द्यायला सुरुवात करेन.’ या भूमिकेला जागत रामराजे आजपावेतो एका शब्दानेही बोलले नव्हते. मात्र, सभापतिपदी निवड झाल्यानंतर त्यांनी जिल्ह्यात पाऊल टाकले अन् उदयनराजेंचा हिशेब रविवारी चुकता केला.(आणखी वृत्त हॅलो ३)