शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीवर उदयनराजेंचा निशाणा

By admin | Updated: December 23, 2014 23:52 IST

कायदा धाब्यावर : शिवराज पंपाजवळील जागा देण्यास कडाडून विरोध

सातारा : बाजार समितीचे कारभारी आणि त्यांच्या म्होरक्यांना शिवराज पेट्रोल पंपाशेजारील जागेचे डोहाळे लागले आहेत; परंतु सावजी पवारांनी दिलेली जागा स्वार्थासाठी वापरली गेली. त्यामुळे नवीन जागेचाही कायदा धाब्यावर बसवून, स्वार्थासाठी वापर केला जाईल, अशी वस्तुस्थिती दिसत आहे. त्यामुळे शिवराज पंपाशेजारील जागा बाजार समितीला देण्यास शेतकरी व जनतेसह आमचा विरोध राहील, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे.या संदर्भातील पत्रकात त्यांनी म्हटले आहे, ‘बाजार समितीच्या कारभाऱ्यांनी बक्षीसपत्राने मिळालेल्या जागेचा शेतकरी हितासाठी वापर न करता, स्वार्थासाठी केला. मनवे नामक सचिव लाचलुचपतच्या जाळ्यात अडकला. जागा कशासाठी घेतली आणि गाळ्यांमध्ये काय धंदे चालले आहेत, हे जनता बघत आहे. जागेचा हवा तसा व कायदा वाकवून वापर केला. बाजार समितीतीलङ्कगाजलेली बेदिली, भ्रष्टाचार बाहेर आला. मनवे छोटा मासा आहे. त्याच्या जोडीला अनेक ‘बिग बुल’ असल्याशिवायङ्कतो बेकायदा बाबी रेटणार नाही. काहींनी बाजार समितीच्या चौकशीचीही मागणी केली आहे.’ (प्रतिनिधी)कारभाऱ्यांना नवीन जागेचे डोहाळेबाजार समितीच्या जागेत शेतकरी हितासाठी बांधलेले गाळे, दारु दुकाने आणि बिअरबार-लॉजिंंगसाठी दिली आहेत. यामध्ये कोणाचे हात ओले झाले, हे चौकशीत स्पष्ट होईलच. तथापि बाजारसमितीला दिलेल्या जागेचा वापर करुन झाल्यावर, नवीन जागा पाहिजे, मोठी जागा पाहिजे अशा मागण्या ठराव पारीत करण्यात येऊन शिवराज पेट्रोल पंपाशेजारील जागा ताब्यात घेण्याचे डोहाळे बाजार समितीच्या कारभाऱ्यांना लागले आहेत, असे पत्रकात म्हटले आहे.