शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिन्यांपूर्वी तपासणी होऊनही दुर्घटना !

By admin | Updated: January 9, 2017 00:09 IST

कारभारावर प्रश्नचिन्ह : मान्सूनपूर्व अन् मान्सुनोत्तर तपासणी अहवालात दडलंय तरी काय ?

जगदीश कोष्टी ल्ल सातारातारळी धरणाच्या दरवाजाचे बॉनेट तुटल्याने अचानक एक हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. वास्तविक पाहता कोणत्याही धरणाची मान्सूनपूर्व व मान्सुनोत्तर असे दोनवेळा तपासणी करून अहवाल दिला जातो. मात्र, या अहवालात दडलंय तरी काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तारळी धरणाच्या पाच दरवाजांपैकी मधल्या दरवाजाचे बॉनेट शनिवारी सकाळी अचानक तुटले. त्यामुळे एक हजार क्युसेक विसर्ग तारळी नदीपात्रात होत असल्याने पूरस्थिती उद्भवली होती. अचानक घडलेल्या बाका प्रसंगामुळे धरण व्यवस्थापनही गोंधळले. गळती रोखण्यासाठी त्यांनी त्यांच्या परीने प्रयत्नही केले. अखेर तांत्रिक कारणे पुढे आल्याने साताऱ्यातून आलेल्या कृष्णा खोरेच्या अधिकाऱ्यांनी चौदा तासांनी नवीन दरवाजा बसवून गळती रोखली. या घटनेने सर्वांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे. पालच्या खंडोबाच्या यात्रेतील व्यापाऱ्यातील तारळी नदीकाठीच वाळवंटात दुकाने थाटली होती. ही घटना रात्री घडली असती तर मोठा अनर्थ घडला असता. परंतु, या विभागाने वाहून गेलेला पूल एका दिवसात बनवून दिला हेही नक्कीच कौतुकास्पद आहे.धरण उभारण्यापूर्वीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. या घटनेनंतर खासदार उदयनराजे भोसले, सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यांनी धरणाच्या कामाबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. मंत्री खोत यांनी बांधकामाच्या कारभाराबाबत अहवाल मागविला आहे. परंतु ही घटना घडलीच कशी, या खोलातही जाणे गरजेचे आहे. प्रत्येक धरणाची एप्रिल-मे मध्ये मान्सूनपूर्व आणि मान्सुनोत्तर तपासणी केली जाते. यामध्ये धरणाची उंची, धरण माती, काँक्रीट किंवा दगडातील असल्यास ते कोणत्या प्रकारचे आहे, त्यावरून परिस्थितीचा अहवाल दिला जातो. यामध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास संबंधित विभागाला कळविले जाते. त्यानंतर पावसाळ्यापूर्वी सर्व त्रुटी दूर केल्या जातात. मान्सुनोत्तर तपासणी ही शक्यतो १५ आॅक्टोबरनंतर केली जाते. यामध्येही पुन्हा सर्व घटकांची तपासणी केली जाते. अतिउत्साह येऊ शकतो अंगलटतारळी धरणासारख्या घटना क्वचितच घडतात. या घटनेत क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी कामे सुरू केली तरी वरिष्ठांचे मार्गदर्शन गरजेचे असते. अतिउत्साहात काम करण्यास गेल्यावर होत्याचे नव्हते होण्यास वेळ लागत नाही. काम करण्यासाठी आवश्यक तेवढा वेळ लागला तरी चालेल; परंतु अतिउत्साह दाखवता कामा नये, त्यासाठी वरिष्ठांचा सल्ला घेणे महत्त्वाचेच असते, असे मत या विभागातील एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.धरणाच्या कामाचे यापूर्वी सर्वे झाला. त्यामध्येही धरणाचे काँक्रिट चांगले होते. तरीही बोल्ट उपसून निघाल्याने दुर्घटना कशी घडली हा प्रश्न सर्वांसाठीच अनुत्तरीत आहे. असे उचलतात दरवाजेदरवाजांमध्ये बिघाड असल्यास मनुष्यबळ किंवा विद्युतशक्तीचा वापर केला जातो. तारळी धरणावर विद्युत पुरवठाही कमी पडत असल्याने जनरेटरचा वापर केला जातो. अडचणींचा पिच्छा कायमधरणातील त्रुटींचा पाठपुरावा करताना अनेक अडचणी येतात. यामध्ये पाण्याच्या आतमधील काम असेल तर तांत्रिक अडचणी येतात. अशावेळी परिस्थितीनुसार तात्पुरते किंवा कायमस्वरूपी कामे केली जातात.