शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

गावठी कट्ट्यासह दोन जिवंत काडतुसे हस्तगत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:24 IST

लोणंद : थोपटेवाडी, ता. पुरंदर येथील पेट्रोल पंपावर दुचाकीमध्ये पेट्रोल भरून पैसा न देताच लोणंदकडे पोबारा केला. त्यामुळे संबंधित ...

लोणंद : थोपटेवाडी, ता. पुरंदर येथील पेट्रोल पंपावर दुचाकीमध्ये पेट्रोल भरून पैसा न देताच लोणंदकडे पोबारा केला. त्यामुळे संबंधित व्यक्तीचा पाठलाग करून त्यास पकडले असता त्याच्याकडे गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे, चाकू तसेच चोरीची दुचाकी हस्तगत करण्यात आली. गणेश सुभाष चव्हाण (वय २९, रा. बेगमपूर, ता. मोहोळ, जि. सोलापूर) असे ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पुरंदर तालुक्यातील थोपटेवाडी येथील नम्रता पेट्रोल पंपावर गुरुवार, दि. १ रोजी दुपारी दोनच्या सुमारास गणेश चव्हाण याने दुचाकीमध्ये (एमएच १२ केजी ३८२३) पेट्रोल भरले. मात्र पैसा न देताच त्या ठिकाणाहून लोणंदच्या दिशेने निघून गेला. पंपावरील कर्मचाऱ्यांनी नीरा ते लोणंद पाठलाग करून त्यास जुना फलटण रोड येथे लोणंद पोलिसांच्या ताब्यात दिले.

लोणंद पोलिसांनी त्याची कसून चौकशी व अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी बनावटीचा कट्टा, दोन जिवंत काडतुसे, एक चाकू आढळून आला. त्याच्याकडे असणारी दुचाकीही त्याने पुणे येथून चोरल्याचे निष्पन्न झाले. लोणंदचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, पोलीस हवालदार गार्डे करीत आहेत.

चौकट

पंप मालकाच्या मुलाच्या मित्रांनी लोणंद येथील रेल्वे पुलावर पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र तिथूनही चौघांना गुंगारा देऊन तो निसटला. पुन्हा त्याचा पाठलाग करून जुना फलटण रोड, डॉ. बुटीयानी हॉस्पिटलसमोर आरोपीस पकडून पोलिसांच्या हवाली केल्याने त्याचे गुन्हे उघड करण्यात पोलिसांना यश आले.