शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
3
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
4
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
5
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
6
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
7
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
8
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
9
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
10
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
11
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
12
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
13
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
14
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
15
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
16
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
17
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
18
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
19
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप
20
शेअर बाजारात 'रेड अलर्ट'! 'या' ६ कारणांमुळे सेन्सेक्स-निफ्टी आपटले; तुमच्या पैशांचं काय झालं?

कोरेगावात दोन गटांत तुंबळ हाणामारी

By admin | Updated: February 21, 2015 23:46 IST

परस्परविरोधी तक्रारी : १३ जणांना अटक, शांततेचा भंग केल्याप्रकरणीही गुन्हा नोंद

कोरेगाव : रहिमतपूर येथे झालेल्या जुन्या भांडणाच्या रागातून शुक्रवारी रात्री शहरातील अण्णा भाऊ साठे नगरामध्ये दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारी कोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. पोलिसांनी दहाजणांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. दरम्यान, पोलीस ठाण्याच्या आवारात हाणामारी करून गोंधळ घालत सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी पंधरा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी १३ जणांना अटक केली आहे. त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली.याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की , अण्णा भाऊ साठे नगर येथील लेंडुरी नाल्यावरील पुलावर बाळासाहेब ऊर्फ सतीश बोतालजी हे दुचाकी घेऊन उभे होते. त्याचवेळी विकी बोतालजी याला त्याची ‘दुचाकी बाजूला घे,’ असे म्हटल्यावरून त्याच्यासह चंद्रकांत बोतालजी, लक्ष्मण बोतालजी, नितीन बोतालजी व आशा बोतालजी यांनी रहिमतपूर येथे झालेल्या जुन्या भांडणाचा राग मनात धरून शिवीगाळ, दमदाटी करत हाताने मारहाण केली. याप्रकरणी सतीश बोतालजी यांनी तक्रार दाखल केली आहे. विकी बोतालजी याने दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, रहिमतपूर येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून बाळासाहेब ऊर्फ सतीश बोतालजी याने स्वत:ची दुचाकी जाणीवपूर्वक माझ्या दुचाकीला धडकवली. त्यानंतर सतीश बोतालजी याच्यासह शशिकांत बोतालजी, युवराज बोतालजी, राजेंद्र बोतालजी व संतोष बोतालजी यांनी एकत्रित येऊन माझ्याशी आणि माझ्या घरातील लोकांशी वाद घालत शिवीगाळ व दमदाटी केली. यावेळी चंद्रकांत बोतालजी याच्या हाताला दुखापत झाली. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्यानंतर पोलिसांनी दोन गुन्हे नोंद केले आहेत. दरम्यान, भांडणानंतर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्यास आलेल्या दोन्ही गटांतील जमावामध्ये पोलीस ठाण्याच्या समोरील मैदानामध्ये तुंबळ हाणामारी झाली. शिवीगाळ, दमदाटी करत मोठमोठ्याने आरडाओरडा करत जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी बाळासाहेब ऊर्फ सतीश बोतालजी, पंचायत समिती सदस्य रवींद्र बोतालजी, अशोक बोतालजी, सुरेश बोतालजी, शशिकांत बोतालजी, युवराज बोतालजी, राजेंद्र बोतालजी, अक्षय बोतालजी, प्रशांत संगपाळ, विकी बोतालजी, चंद्रकांत बोतालजी, लक्ष्मण बोतालजी, आशा बोतालजी, नितीन बोतालजी व सुरेश बोतालजी यांच्या विरोधात सरकारतर्फे हवालदार सतीश साबळे यांनी फिर्याद दाखल केली आहे. कोरेगाव पोलीस अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)