शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

दोन-दोन बंगले, चारचाकी तरीही घरकूल !

By admin | Updated: July 13, 2016 23:41 IST

साताऱ्यातील प्रकार : गरीब उघड्यावर अन् धनदांडग्यांना घरांचा लाभ; लाभार्थ्यांचा ‘आदर्श घोटाळा

सागर गुजर / सातारा शासनाने झोपडपट्टीत खितपत पडलेल्या नागरिकांच्या उत्थानासाठी झोपडपट्टी निर्मूलन योजना राबविली. शहरातही या योजनेच्या माध्यमातून झोपडपट्ट्यांच्या जागी मोठाले इमले सरकारी खर्चातून उभारले. मात्र, इमल्यांमध्ये गरिबांना लाथाडून धनदांडग्यांनीच शिरकाव केल्याचे चित्र साताऱ्यात आहे. नावावर दोन-दोन बंगले, आलिशान चारचाकी गाड्या असणाऱ्या धनिकांनाच घरकुलाचा लाभ देण्याचा प्रकार शहरात सुरू आहे. त्यांची नावे घरकूल लाभार्थ्यांच्या यादीत घुसविण्यात आली आहेत. घरकुलामध्ये हा आदर्श घोटाळा पालिकेच्या कृपेने सुरू असून, जर तो थांबवला नाही, तर शासनाच्या योजनेच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जाणार आहे. झोपडपट्ट्यांमध्ये वर्षानुवर्षे दारिद्र्यात खितपत पडलेल्या कुटुंबांच्या उत्थानासाठी केंद्र व राज्य शासनाने झोपडपट्टी निर्मूलन योजना राबविली आहे. लाभार्थ्यांचा नाममात्र हिस्सा घेऊन त्याला केंद्र व राज्य शासनाकडून निधी मिळवून देशात नगरपालिकांच्या शहरामध्ये अशा योजना आकाराला आल्या आहेत. सातारा शहरात भीमाबाई आंबेडकर झोपडपट्टी, लक्ष्मी टेकडी, केसरकर पेठ, मंगळवार पेठ, परीट बोळ अशा परिसरामध्ये घरकुले उभारण्यात आली आहेत. बहुतांश इमारतींची कामे पूर्णत्वास आली आहेत. या घरकूल योजनेत बहुतांश लाभार्थ्यांची आर्थिक परिस्थिती बक्कळ असतानाही त्यांनी आपले उखळ पांढरे करून घेतले आहे. एकट्या भीमाबाई आंबेडकर झोपडपट्टीमध्ये २३३ इतके लाभार्थी आहेत. त्यापैकी ५0 टक्के मंडळींची बोटे तुपात असतानाही त्यांना घरकुलाचा मलिदा खाऊ घालण्यात येत आहे. पालिकेने संबंधितांच्या आताच्या आर्थिक परिस्थितीचा अभ्यास केल्यास या मंडळींचे पितळ उघडे पडू शकते. गोरगरिबांच्या उत्थानासाठी असणाऱ्या योजनांवर श्रीमंतांनीच ताव मारायचा ठरविल्यास ज्यांच्यासाठी योजना राबवायच्या ती मंडळी पालिकेच्याच कुठल्यातरी जागेवर पुन्हा पथारी पसरून राहतील. योजनेच्या उद्देशालाच हरताळ फासला जाण्याची शक्यता आहे; परंतु आगामी निवडणुकीवर डोळा ठेवून भलत्याच लाभार्थ्यांना फायदा दिला गेला, तर इतर गरिबांवर तो अन्याय ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनीच या प्रकरणात लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे. झोपडपट्टी घरकूल योजनेतील लाभार्थ्यांकडून शपथपत्रे लिहून घेण्याची सूचना पालिकेला केल्यास गरजू किती आणि धनदांडगे किती याचे वास्तव पुढे येऊ शकते.