शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

‘सुंदर माझं घर’स्पर्धेत सव्वाशे कुटुंबांचा सहभाग

By admin | Updated: October 8, 2015 01:08 IST

शाहूपुरी माध्यमिक शाळेचा उपक्रम : पुस्तकी ज्ञानाबरोबरच विद्यार्थी गिरवतायत पर्यावरण अन् निती शास्त्राचे धडे

शाहूपुरी : राष्ट्रीय एकात्मता विकास कार्यसंघ शाहूपुरी सातारा संचलित शाहूपुरी माध्यमिक विद्यालयाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्ताने संस्थेने ‘आदर्श ग्राम’च्या धर्तीवर शालेय विद्यार्थी व पालकांच्या सहभागातून १५ आॅगस्ट रोजी ‘सुंदर माझं घर’ या संकल्पनेची स्पर्धात्मक पातळीवर घोषणा केली होती. त्यास उत्तम प्रतिसाद लाभला असून, सुमारे १२६ कटुंबांनी यामध्ये आपला सहभाग नोंदविला आहे.वर्षभराच्या कालावधीत तीन अंतर्गत व एक बाह्य परीक्षणांतर्गत स्वच्छता, आरोग्य, पर्यावरण रक्षण, इंधन, वीज, पाणी बचत आदी दहा निकषांवर आधारित असलेल्या निवड प्रक्रियेतील निरीक्षणांचा भाग म्हणून गणेशोत्सव काळात या सर्व कुटुंबांची वेगवेगळ्या तीन समित्यांमार्फत पहिली परीक्षण फेरी नुकतीच पूर्ण झालेली असून, संस्थेमार्फत विद्यालयातील विशेषकरून स्पर्धेतील सहभागी कुटुंबांचे या सर्व निकषांचे पालन योग्य तऱ्हेने होण्यासाठी सहविचार सभा, प्रबोधनात्मक पत्रके, घर भेटी याद्वारे प्रबोधन करण्याचा नियोजनात्मक पद्धतीने प्रयत्नही होत आहेत व याचाच परिणाम म्हणून या स्पर्धेतील सहभागी कुटुंबांपैकी ज्यांचे घरी गणेशोत्सव साजरा होतो, अशांपैकी पन्नास टक्क््यांहून जादा कुटुंबांनी माती, शाडूच्या, इकोफ्रेंडली मूर्तींचा वापर करणे, निर्माल्यासाठी स्वतंत्र व्यवस्था, विजेचा कमीत कमी वापर, थर्माकोल, प्लास्टिक टाळून सजावट करणे, देखाव्यातून सामाजिक प्रबोधन करणे या मुद्द्यांचा पुरेपूर वापर केलेला दिसून येत आहे. तसेच कुटुंबातील सर्व लहान, थोर घटकांची अशा रितीने गणेशोत्सव साजरा करण्याची मानसिकता तयार होणे हेच या स्पर्धेचे प्राथमिक यश आहे.यावेळचे वैशिष्ट्य म्हणजे, विद्यार्थ्यांबरोबरच संस्था व विद्यालय पातळीवरील पदाधिकारी शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी देखील पर्यावरणपूरक गणेशोत्सव व या स्पर्धेतील दहा निकषांचे वैयक्तिक घरांच्या पातळीवर पालन करण्याच्या दृष्टीने या गणेशोत्सवाच्या माध्यमातून एकजुटीने पाऊल टाकले असून, विद्यालयातील मातीच्या श्रीगणेशाचे विसर्जनही क्रीडांगणावर विद्यार्थ्यांनी एका मोठ्या पिंपात विधिवत करून बाप्पांना निरोप दिला. विद्यालयाच्या जागेत खणलेल्या एका खड्ड्यात सर्व निर्माल्य खतासाठी टाकण्यात आले व याचा उपयोगही विद्यालयाचा शेतकरी संघ करणार आहे. विसर्जनानंतरचे पाणी, फुलशेती व शेतकरी संघाच्या शेतीसाठी वापरण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांवर वेगळे संस्कार होत आहेत. आहे. (प्रतिनिधी)प्रत्येक विद्यार्थी बनला दूत...!शाहूपुरी माध्यमिक विद्यालयाने रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विविध उपक्रमांच्या माध्यमातून शाळेतील विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग नोंदवून घेण्यासाठी काही विशेष उपक्रमांचे आयोजन केले आहे. समाजाभिमुख विद्यार्थी घडविण्यासाठी त्यांच्यातील सामाजिक जाणीवा जागृत करणे आवश्यक आहे. विविध उपक्रमांच्या माध्यमातून शाळेतील प्रत्येक विद्यार्थी दूत म्हणून शाहूपुरी परिसरात वावरत आहे. सामाजिक जाणीव निर्माण करण्याच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.