शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
7
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
8
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
9
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
10
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
11
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
12
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
13
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
14
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
15
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
16
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
17
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
18
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
19
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
20
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान

नदी पुनरुज्जीवनासाठी सव्वाआठ कोटी

By admin | Updated: December 25, 2015 23:59 IST

अश्विन मुदगल : माण, खटाव तालुका; ‘जलयुक्त’ अंतर्गत माणगंगेवर १८ तर येरळा नदीवर १० बंधाऱ्यांची होणार उभारणी

सातारा : ‘जलयुक्त शिवार’ अभियानांतर्गत नदी पुनरूज्जीवन कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील माण-खटाव येथे नवीन सिमेंट नालाबांध कार्यक्रमास शासनातर्फे मान्यता देण्यात आली असून, सन २०१५-१६ या वर्षामध्ये ८ कोटी २३ लाख रुपये निधी मंजूर झाला असून, मागगंगेवर नव्या १८ सिमेंट बंधारे व रानमळा येथे ५ व येरळा नदीवर १० अशा एकूण ३३ बंधाऱ्याची उभारणी करण्यात येणार आहे,’ अशी माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी पत्रकार परिषदेत दिली. गेल्या वर्षभरात झालेल्या कामाचा आढावा व त्याची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी ते म्हणाले, ‘जिल्ह्यात ‘जलयुक्त शिवार’ अभियानांतर्गत नदी, ओढा व नाल्यांमधील गाळ काढणे, सरळीकरण व खोलीकरण ही कामे लोकसहभागातून करून नदी, ओढा, नाला पुनर्जीवन करण्यास पुढाकार घेऊन लोकवर्गणी, श्रमदानाद्वारे मोठ्या प्रमाणात योगदान दिले आहे किंवा देत आहेत, अशा गावांमध्ये घेण्यात आलेल्या नदी, ओढा व नाला पुनरूज्जीवन कार्यक्रमास प्रोत्साहन देण्यासाठी अभिसरणाच्या माध्यमातून कार्यक्रम राबविण्यास शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. दि. १७ नोव्हेंबर व ३ डिसेंबर २०१५ रोजी ग्रामविकास व जलसंधारणमंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री विजय शिवतारे आणि सचिव प्रभाकर देशमुख यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सादरीकरण केले होते. या सादरीकरणाच्या अनुषंगाने माण तालुक्यातील माणगंगा नदीवर १८ बंधारे, रानमळा येथे ५ व येरळा नदीवर १० अशा एकूण ३३ बंधाऱ्यास मान्यता देण्यात आली. यासाठी सन २०१५-१६ या वर्षामध्ये एकूण ८ कोटी २३ लाख निधी मंजूर झाला आहे. ‘सर्व सिमेंट नाला बांधाऱ्याची कामे मार्च २०१६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. त्यासाठी लघुसिंचन (जलसंधारण), जलसंपदा विभाग व जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून कामे पूर्ण करण्यात येतील. ही कामे मुदतीत पूर्ण करण्याची आवश्यकता असल्याने निविदा मुदत कमी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे,’ असे मुदगल यांनी सांगितले. (प्रतिनिधी)महाराजस्व अभियान...२ लाख २६ हजार ५२१ खातेदारांच्या सातबारावरील इतर हक्कांतील हस्तांतरण बंदीचे शेरे उठविण्यात आले आहेत. त्यामुळे या लोकांना आपल्या जमिनी खरेदी-विक्री, विकसन करणे सोयीचे होत आहे.ज्या प्रकल्पग्रस्तांना दहा वर्षांपूर्वी जमिनीचे वाटप झाले होते. अशा २,५९४ प्रकल्पग्रस्तांनी कब्जा हक्काची रक्कम भरल्याने जमीन त्यांच्या नवीन शर्तीऐवजी जुन्याशर्तीची करण्यात आली. महाराजस्व अभियानांतर्गत १ जुलै ते आजअखेर २५८ शिबिरे घेण्यात आली असून, आॅक्टोबर २०१५ अखेर विविध प्रकारचे ८५,८३३ दाखल्यांचे वाटप करण्यात आले आहेत.अतिक्रमित रस्त्यांवरील १६६ अतिक्रमणे काढण्यात आली आहेत. याचा २० हजारांहून अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ झाला आहे.गौणखनिज अनधिकृत वाहतूक प्रकरणांमध्ये आजअखेर १ कोटी ९६ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच ३६ फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.या वर्षात ५५० नव्या विहिरी पूर्ण, पुढील वर्षात ६०० विहिरींचे उद्दिष्ट.१ हजार विहिरींचे पुनर्भरण पूर्ण करण्यात येणार आहे.‘जलयुक्त’च्या कामावर ७९ कोटी खर्चजलयुक्त शिवार अभियानांतर्गत २१५ गावांची निवड अभियानांतर्गत ४,७१३ कामे पूर्ण तर १,३०९ कामे प्रगतिपथावर १० हजार ५७७ हेक्टरवर ट्रीटमेंटआत्तापर्यंत जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांवर ७९ कोटी खर्चअपेक्षित पाणीसाठा २४००० टीसीएम