शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

राजवाडा बसस्थानकाला टाळे ठोकू

By admin | Updated: July 30, 2014 23:18 IST

परळी आढावा बैठक : गाड्यांच्या अनियमिततेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांचा एसटीच्या अधिकाऱ्यांना इशारा

परळी : एसटी बसेस वेळेवर येत नाहीत यासह अनेक तक्रारींचा पाढा वाचून येथील प्रभाग आढावा बैठकीत परिसरातील ग्रामस्थांनी तक्रारींचा पाढा वाचला. एसटीच्या गाड्या रद्द होणे, वेळेवर न येणे, गाड्या गळक्या असणे, अशा अनेक कारणांमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी राजवाडा बसस्थानकाला टाळे ठोकण्याचा इशारा एसटीच्या अधिकाऱ्यांना दिला. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही अधिकाऱ्यांना धारेवर धरले आणि लवकरात लवकर कारभारात सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या.प्रभाग आढावा बैठकीला पंचायत समितीचे सभापती धर्मराज घोरपडे, उपसभापती विजय काळे, जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले, पंचायत समितीच्या सदस्या कविता चव्हाण, सदस्य सोमनाथ पवार, गटविकास अधिकारी चंद्रशेखर जगताप, पोलीस निरीक्षक विष्णू पवार, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र कांबळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत कारखानीस, परळीचे सरपंच सतीश बोबडे तसेच विविध खात्यांचे अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.बैठक सुरू होताच ग्रामस्थांनी एसटी महामंडळ, वीजवितरण कंपनी, पशुवैद्यकीय विभाग, कृषी विभाग, उरमोडी धरण विभाग, पाटबंधारे विभाग यांच्याविषयीच्या अडचणींचा पाढा वाचायला सुरुवात केली. एसटी महामंडळाने प्रत्येक बैठकीप्रमाणे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना ‘प्रस्तवा पाठविले आहेत, नवीन गाड्या वाढविल्या आहेत,’ अशी उत्तरे देण्यास सुरुवात केल्यावर ग्रामस्थ संतप्त झाले. गाड्या वेळेवर येत नाहीत. अचानक रद्दसुद्धा होतात, असे सांगत ‘आम्ही राजवाडा बसस्थानकाला टाळे ठोकू,’ असा इशारा ग्रामस्थांनी एसटी महांडळाच्या अधिकाऱ्यांना दिला. आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘लोक बसस्थानकातून मला फोन करतात. गाड्या अचानक रद्द का होतात? राजवाडा बसस्थानक प्रवाशांच्या सोयीसाठी की गैरसोयीसाठी?’कृषी विभागानेही आपल्या योजना राबविताना कृषी सहायकाकडून नव्हे तर गावचे सरपंच आणि लोकप्रतिनिधींना विचारात घेऊन योजनेचा निधी खर्च करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. बुडित क्षेत्रात गेलेल्या दहिवड, बनघर, लुमणेखोल, वेणेखोल, पुनवडी, आरगडवाडी, रोहोट, नित्रळ, कातवडी या गावांना आरोग्य सुविधा द्याव्यात, पाण्याचे निर्जंतुकीकरण करावे, या ग्रामस्थांना कोणत्याही अडचणी येऊ देऊ नयेत, आरोग्य उपकेंद्रामध्ये दररोज तीन ते पाच या वेळेत आरोग्यसेवक व सेविकांनी उपस्थित राहावे, वन अधिकाऱ्यांनी गावांना, शाळांना, ग्रामपंचायतींना मोफत रोपे वाटावीत, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी जनावरे दवाखान्यात येण्याची वाट न पाहता गावोगावी जाऊन लसीकरण करावे, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. (वार्ताहर)