शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

‘पुस्तकांचे हळदी-कुंकू ’ कार्यक्रमातून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : ‘आम्ही लेखिका’ या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या सातारा जिल्हा समूहाच्यावतीने ‘पुस्तकांचे हळदी-कुंकू’ हा आगळावेगळा कार्यक्रम झाला. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : ‘आम्ही लेखिका’ या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या सातारा जिल्हा समूहाच्यावतीने ‘पुस्तकांचे हळदी-कुंकू’ हा आगळावेगळा कार्यक्रम झाला. यानिमित्ताने वाचन संस्कृतीला बळ देण्यासाठी एक सकारात्मक पाऊलही उचलण्यात आले.

साताऱ्यातील दीपलक्ष्मी हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला. धार्मिक परंपरांना फाटा देत ‘आम्ही लेखिका’च्या शब्दसखींनी एकत्र येत पुस्तकांचे हळदी कुंकू साजरे केले. तर यामध्ये तिळगुळ, साहित्यिक गप्पागोष्टी तसेच प्रत्येकीने किमान एक पुस्तक जमा करून ते का वाचावे याबद्दल बोलायचे, असे या कार्यक्रमाचे स्वरूप होते.

स्मार्टफोनच्या जमान्यात पुस्तक वाचन कमी होताना दिसत आहे. अशातच ते विकत घेऊन वाचणे तर आणखी दूरची गोष्ट. म्हणून वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणारे असे कार्यक्रम सतत व्हायला हवेत, असे मतही यावेळी ‘आम्ही लेखिका’च्या सदस्यांनी मांडले.

या कार्यक्रमात मार्गदर्शिका अ‍ॅड. सीमंतिनी नुलकर, अध्यक्षा शुभांगी दळवी, उपाध्यक्षा कल्याणी थत्ते, सचिव अ‍ॅड. डॉ. सुचित्रा घोगरे-काटकर, कोषाध्यक्षा सविता कारंजकर, कार्यवाह अ‍ॅड. जान्हवी जोशी, निमंत्रक डॉ. संजीवनी पिंगळे, संचालक अ‍ॅड. संगीता केंजळे, आराधना गुरव, शुभांगी कुंभार, संगीता गुरव, डॉ. नलिनी महाडिक यांच्यासह सातारा जिल्ह्यातील अनेक शब्दसखी सहभागी झाल्या होत्या.

फोटो दि. १४सातारा आम्ही लेखिका फोटो...

फोटो ओळ : सातारा येथे आम्ही लेखिका संस्थेच्या ‘पुस्तकांचे हळदी-कुंकू’ कार्यक्रमात मोठा सहभाग दिसून आला.

..............................................................