शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

फौजीमुळे सापडले चोरटे!

By admin | Updated: May 22, 2014 00:20 IST

बारा वाहने जप्त : वाहने चोरणारी टोळी गजाआड

 सातारा : गेल्या काही महिन्यांपासून शहर आणि परिसरातून जबरी चोरी आणि वाहन चोरी करणार्‍या टोळीचा पर्दाफाश झाला असून, ही टोळी सैन्य दलातील एका जवानाच्या प्रतिकारामुळे पोलिसांच्या हाती लागली, अशी माहिती पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. अकीबजावेद कासमसाहेब नंदगळकर ऊर्फ अकीब गुलाब शेख ऊर्फ अकीब गुलाब बागवान (वय १९ रा. निसर्ग कॉलनी अपार्टमेंट करंजे, सातारा), हर्षद राजू बागवान (वय २१ रा. यादोगोपाळ पेठ, सातारा), असिफ शमशुद्दीन पठाण (वय १९, रा. शनिवार पेठ, सातारा), आतिक हसन शेख (वय १९, रा. बुधवार पेठ, सातारा), मोहसीन ऊर्फ गैस वल्ली शेख (वय १९, रा. आकाशवाणी झोपडपट्टी, सातारा) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांंची नावे आहेत. टोळीत या पाचजणांसह दोन अल्पवयीन मुलांचाही सहभाग असून त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. ही टोळी शहर परिसरातून वाहने चोरायची. त्यानंतर रात्री त्याच वाहनातून एकट्या-दुकट्या प्रवाशाला ‘लिफ्ट’ देण्याचा बहाणा करून गाडीत घ्यायचे. लूटमार करून नंतर त्यांना सोडून द्यायचे. असा त्यांचा उद्योग नेहमी सुरू असायचा. मात्र, पोलिसांच्या हाती ही टोळी सापडत नव्हती. दि. १३ मे रोजी रात्री सैन्यदलातील जवान संजय साळुंखे (रा. देगाव, ता. सातारा) यांनाही अशाच प्रकारे लुटण्याचा या टोळीचा बेत होता. परंतु साळुंखे यांच्या प्रतिकारामुळे त्यांचा डाव फसला आणि एका चोरट्याला त्यांनी पकडले. त्यामुळे या टोळीची इत्थंभूत माहिती पोलिसांना समजली. त्यानंतर टोळीतील एकेका चोरट्याला पोलिसांनी काही तासांतच अटक केली. विशेष म्हणजे या टोळीने केवळ दोन महिन्यांत तब्बल १९ गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. आणखी बरेच गुन्हे या टोळीकडून उघडकीस येणार आहेत. १२ वाहनांसह ११ मोबाइल, १० हजारांची रोकड असा सुमारे ५ लाख ६३ हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक रवींद्र मुठाणे, गुन्हे प्रकटीकरण विभागाचे सहायक फौजदार दिलीप अहिरे, भीमराव चव्हाण, हवालदार बशीर मुलाणी, नीलेश काटकर, किशोर वायदंडे, विशाल सर्वगौड, ज्योतिराम बर्गे, विशाल मोरे, राजू कांबळे, प्रमोद सावंत आदी कर्मचार्‍यांनी भाग घेतला. (प्रतिनिधी)